शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सीओईपीचा पुढाकार

By admin | Updated: July 27, 2015 04:02 IST

‘‘भूस्खलन हे प्रामुख्याने पाणी आणि माती यांच्यामुळे होते. पाण्याचा योग्य निचारा झाल्यास भूस्खलन टाळता येऊ शकते. त्यामुळे राज्यातील धोकादायक गावांचे

निनाद देशमुख ,पुणे‘‘भूस्खलन हे प्रामुख्याने पाणी आणि माती यांच्यामुळे होते. पाण्याचा योग्य निचारा झाल्यास भूस्खलन टाळता येऊ शकते. त्यामुळे राज्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. शासकीय यंत्रणांनी याचा अभ्यास करून धोक्याची पातळी निश्चित करून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास भविष्यात माळीण दुर्घटनेसारख्या घटना टाळता येतील़ अशा धोकादायक गावांचा अहवाल दिल्यास तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सीओईपीकडून पुढाकार घेतला जाईल़,’’ असा विश्वास माळीण पुनर्वसनाचे ‘टाऊन प्लॅनिंग’ करणारे सीईओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. भालचंद्र बिरासदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.माळीण दुर्घटनेला ३१ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या गावाच्या पुनर्वसनासाठी आमडे गाव निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणी पुण्यातील सीईओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातर्फे गावाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या घटनेनंतर महसूल विभाग आणि सर्वे आॅफ इंडियातर्फे या परिसरातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार या गावाची धोक्याची पातळी निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती बिरासदार यांनी दिली. धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला पाहिजे, अशा गावांचे मॅपिंग करून धोक्याची पातळी निश्चित करता येऊ शकते. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य आहे. शासनाने अशी पाहणी करून धोकादायक गावांचा अहवाल दिल्यास तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ‘सीओईपी’तर्फे पुढाकार घेतला जाईल, असे ते म्हणाले. सर्व शासकीय नियम तपासून आमडे येथील पुनर्वसन करण्यात येत आहे. या गावाच्या विकास आराखड्यात कोणतीच तडजोड करण्यात आलेली नाही. एका आदर्श गावाच्या सर्व बाबी या आराखड्यात समाविष्ट आहेत.भविष्यात या ठिकाणी भूस्खलन होऊ नये, यासाठी या डोंगरांवर पाण्याचा निचरा करण्यासाठी पाट बांधण्यात येणार आहेत. ज्यामुळे डोंगरात पाणी मुरणार नाही. या बरोबरच जमिनीची धूप थांबवण्यासाठी या ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे, त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता कमी होईल, यात शासनाचा पुढाकार महत्त्वाचा आहे, आम्ही आमच्या पातळीवर मदत करण्यास तयार आहोत, असे बिरासदार यांनी सांगितले.