शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

कामांना आचारसंहितेचा अडथळा

By admin | Updated: May 22, 2014 06:10 IST

आचारसंहितेमुळे विकासकामांना खिळ बसू नये, यासाठी ८०० कोटींच्या विकासकामांच्या निविदा काढून, तातडीने कामाचे आदेश देण्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी नियोजन केले होते.

पिंपरी : आचारसंहितेमुळे विकासकामांना खिळ बसू नये, यासाठी ८०० कोटींच्या विकासकामांच्या निविदा काढून, तातडीने कामाचे आदेश देण्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी नियोजन केले होते. निविदा काढण्याची घाई केली असताना, निवडणूक आयोगाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला. आचारसंहितासुद्धा लागू झाली. त्यामुळे आयुक्तांनी विकासकामांच्या निविदा प्रक्रियेची केलेली घाई निष्फळ ठरली. निविदा काढून कामाचे महापालिका आयुक्तांनी सुमारे सातशे विकास कामे पूर्ण करण्यासाठी घाई-गडबडीने निविदा काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. परंतु राज्यातील विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता अचानक लागली आहे. त्यामुळे आयुक्तांना करावयाच्या या विकास कामांना आणखी महिनाभरासाठी खिळ बसली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होताच महापालिका आयुक्त जाधव यांनी प्रभाग स्तरावर बैठका घेऊन कामांचे नियोजन केले होते.अर्धवट कामांचा आढावा घेतला होता. स्थापत्य आणि मलनि:सारण विभागाची सुमारे ८०० कोटींची काम करण्याचे त्यांनी नियोजन केले होते. प्रभाग स्तरावर १० लाखाच्या खालच्या ४० कामांच्या तर १० लाखाच्या वरील रकमेच्या ७०० कोटींच्या निविदा काढण्याची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यान्वित केली होती. १० जूननंतर आचारसंहिता लागू होईल, अशी शक्यता लक्षात घेऊन त्यांनी लवकरच निविदा काढणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले होते. त्यांचा अंदाज चुकला.(प्रतिनिधी)