शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ने कोचिंग महागणार

By admin | Updated: June 27, 2017 08:01 IST

दिवसेंदिवस खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणे महाग होत असताना आता त्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीची भर पडणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दिवसेंदिवस खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणे महाग होत असताना आता त्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीची भर पडणार आहे. कोचिंग क्लासेसवर पूर्वी असलेल्या १५ टक्के सेवा करात जीएसटीमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे या क्लासेसमध्ये प्रवेश घेणे महागणार असून क्लासेसकडून विद्यार्थ्यांना दि. ३० जूनपर्यंत प्रवेश घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. तसेच दि. १ जुलैनंतर प्रवेश घेतल्यास वाढीव शुल्क भरावे लागणार असल्याचेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.देशभरात येत्या एक जुलैपासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) ही करप्रणाली लागू होणार आहे. या नव्या जीएसटी तरतुदीचा सर्वाधिक फटका विद्यार्थी व पालकांना बसणार आहे. शिक्षणक्षेत्रात वाढत चाललेल्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा ओढा खासगी कोचिंग क्लासेसकडे वाढला आहे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, त्यात सातत्याने होणारे बदल, महाविद्यालय स्तरावर योग्य मार्गदर्शन न मिळणे, विविध प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमातील तफावत, तसेच प्रवेशासाठी वाढलेल्या स्पर्धेमुळे कोचिंग क्लासेसचे पेव वाढत चालले आहे. मागील काही वर्षांपासून या क्लासेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. या क्लासेसची महाविद्यालयांना समांतर यंत्रणा उभी राहू लागली आहे. त्यातच वाढत्या शुल्कामुळे विद्यार्थी व पालक बेजार झालेले आहेत. आता त्यात पुन्हा जीएसटीची भर पडली आहे.