शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सहकार निवडणुकीचे कोलमडले नियोजन

By admin | Updated: September 12, 2014 03:32 IST

सहकारी संस्थांच्या निवडणुक नियमांचे गॅझेट अजूनही प्रसिद्ध झाले नसल्याने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे नियोजन कोलमडले आहे

पुणे : सहकारी संस्थांच्या निवडणुक नियमांचे गॅझेट अजूनही प्रसिद्ध झाले नसल्याने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे नियोजन कोलमडले आहे. परिणामी ३५ ते ४० हजार संस्थांच्या निवडणुकीची कार्यक्रमपत्रिका तयार करण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. नव्याने लागू झालेल्या सहकारी कायद्यानुसार गृहसंस्थांपासून सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. राज्यात २ लाख २७ हजार सहकारी संस्था असून, डिसेंबर अखेर सुमारे पस्तीस ते चाळीस हजार संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. राज्य स्तरावरील सर्व सहकारी संस्था, साखर कारखाने, नागरी बँका, दुग्ध संस्था अशा ‘अ’ व ‘ब’ श्रेणीतील संस्थांच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकीनंतरच होतील. त्या पुर्वी ड श्रेणीतील गृहसंस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी सहकारी संस्थांना त्यांची मतदार यादी डिजिटल स्वरुपात व अल्फाबेटिकली (ए ते झेड क्रमाने) करण्याचा आदेश देण्यात आला आहेत. मतदारयादी ‘आय’ रजिस्टर प्रमाणे करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार अनेक संस्थांनी प्राथमिक मतदार यादी देखील तयार केली आहे. तसेच नवीन नियमांची सहकार विभागातील अधिकाऱ्यांना माहिती देण्यासही सुरुवात देखील करण्यात आली आहे. मात्र निवडणुक नियमांचे गॅझेट प्रसिद्ध न झाल्याने सहकार निवडणुकांची प्रक्रिया खोळंबली आहे. सद्य:स्थितीत हे प्रकरण विधी व न्याय विभागाकडे प्रलंबित असल्याचे समजते. त्यांच्या अंतिम मान्यतेनंतर ते प्रसिद्ध होईल. (प्रतिनिधी)