शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरच्या ‘फायर सेफ्टी’वर बारीक लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST

पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोविड सेंटरमध्ये घडत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये वारंवार फायर ऑडिट केले ...

पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोविड सेंटरमध्ये घडत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये वारंवार फायर ऑडिट केले जात आहे. यासोबतच कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांना अग्निप्रतिरोधक यंत्रणा कशी वापरायची आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांच्या बचावासाठी नेमके काय करायचे, याचे प्रशिक्षण दिले जात आहे. विरार येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व ठिकाणी पुन्हा फायर ऑडिट करून घेण्यात येणार असून, खासगी रुग्णालयांनाही याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वच रुग्णालयांमधील ‘फायर सेफ्टी’वर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.

नुकत्याच नाशिक आणि विरार येथे दोन दुर्घटना घडल्या. यामध्ये अनेक कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील सर्व कोविड सेंटरचे फायर ऑडिट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात अग्निशामक दलाच्या सर्व अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. या वेळी सर्वांना खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट सुरू करण्यासंदर्भात परिपत्रक देण्यात आले. ज्या रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा बंद असेल त्यांना नोटीस देऊन ती सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचा ही सूचना देण्यात आल्या आहेत.

-----

भंडारा, नागपूर, मुंबई, विरार या ठिकाणी झालेल्या आगीच्या दुर्घटनांमध्ये शॉर्टसर्किट होणे हे कारण प्रामुख्याने दिसून आले आहे. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. विद्युत उपकरणे २४ तास वापरली जात असल्याने ती गरम होतात. त्यामुळे शॉर्टसर्किटचा धोका अधिक असतो. यासोबतच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उपकरणे तापून आग लागण्याची शक्यता असते.

----

आगीच्या कारणांकडे व्यवस्थापनाने सातत्याने लक्ष द्यायला हवे. विद्युत उपकरणांच्या वायरिंगची सातत्याने तपासणी होणे गरजेचे आहे. या सोबतच कोविड सेंटरमध्ये फायर एक्झिन्ग्यूशर आहेत का आणि ते सुस्थितीत आहेत का हे देखील सातत्याने पाहिले पाहिजे. त्यासाठीचे प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे.

----

पालिकेकडून शहरात विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले जात आहेत. या ठिकाणीसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे.

-----

अग्निशामक दलाच्या जवळपास ५१० जागा रिक्त आहेत. यामध्ये ‘फायरमन’च्या ३९० जागा आहेत. चालकांचीही कमतरता आहे. शहरात एकूण १४ अग्निशामक केंद्र असून आणखी १२ केंद्रांची आवश्यकता आहे.