लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील २२ कनिष्ठ महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातील ७१९ जागा शिक्षण विभागाला बहाल केल्या आहेत. त्यामुळे नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांत व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेण्याचा दरवाजा आता पूर्णपणे बंद झाला आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, दहावीचा निकाल विक्रमी लागल्याने अनेक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळूनही नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे धनिक मंडळी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेण्याचा विचार करतात. मात्र, बहुतांश सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या व्यवस्थापन कोट्यातील जागा परत केल्याने त्यांची अडचण झाली आहे.
सहाय्यक शिक्षण उपसंचालक मीना शेंडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, शहरातल्या अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोटा परत केल्याने या जागा ऑनलाईन प्रवेश फेऱ्यांमधूनच भरल्या जातील.
चौकट
व्यवस्थापन कोटा नाकारणारी महाविद्यालये
फर्ग्युसन, बीएमसीसी, स. प. महाविद्यालय, एमएमसीसी, आबासाहेब गरवारे, एमईएस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, नौरोसजी वाडिया कॉलेज, सूर्यदत्ता जुनिअर कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स, आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल, महिलाश्री हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, सिद्धिविनायक ज्युनिअर कॉलेज, विमलाबाई गरवारे स्कूल, एमईएस हायस्कूल सेकंडरी स्कूल कोथरूड, सेंट मिराज कॉलेज ऑफ गर्ल्स, एमईएस बॉईज स्कूल, नूमवि मुलींची शाळा, रेणुका स्वरूप मुलींची शाळा, फत्तेचंद जैन विद्यालय चिंचवड, अमरिता ज्युनिअर कॉलेज, म्हाळसाकांत स्कूल आकुर्डी.