शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

दावे-प्रतिदावे, रंगले पैजांचे आखाडे

By admin | Updated: February 23, 2017 02:20 IST

जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर तालुक्यातील गावोगावी

ओझर : जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर तालुक्यातील गावोगावी चौकाचौकांत, हॉटेलमध्ये विविध पक्षांचे कार्यकर्ते आपल्याच पक्षाचा उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करीत असून, एकमेकांबरोबर कार्यकर्ते पैजांचे आखाडे भरवत आहेत.जुन्नर तालुक्यात सात जिल्हा परिषद गट, तर १४ पंचायत समिती गण आहेत तालुक्यात आळे-पिंपळवंडी गटात आमदार शरद सोनवणे यांचे बंधू शशिकांत सोनवणे आपला माणूस आपली आघाडीकडून, शिवसेनेकडून मंगेश काकडे तर राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद लेंडे यांच्यात कडवी झुंज झाली तसेच बेल्हे राजुरी गटात राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार वल्लभ शेळके, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व तालुका राष्ट्रवादी काँगे्रस अध्यक्ष पांडुरंग पवार, शिवसेनेचे माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ व आपला माणूस आपली आघाडीचे एकनाथ शिंदे यांच्यात लढत झाली.नारायणगाव-वारुळवाडी गटात सेनेच्या आशाताई बुचके, राष्ट्रवादीच्या राजश्रीताई बोरकर तर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या पत्नी सोनाली पाटे यांनी अपक्ष उभे राहून या गटात चांगली रंगत आणली. धालेवाडीतर्फे हवेली-सावरगाव या गटात काँग्रेसचे सचिन हाडवळे, राष्ट्रवादीचे अरुण पारखे व सेनेचे गुलाब पारखे व आपला माणूस आपली आघाडीचे नीलेश चव्हाण तर भाजपाचे सेनेतून बंडखोरी केलेले सूर्यकांत ढोले यांनी या गटातील निवडणूक चर्चेची केली. तालुक्यातील या गटात वेगवेगळ्या गुपित राजकीय समीकरणांच्या चर्चेमुळे प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते शेवटपर्यंत संभ्रमात होते.विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी काँग्रेस पक्षाच्या पाडळी-निरगुडे, डिंगोरे-पिंपळगाव व धालेवाडी तर्फे हवेली-सावरगाव या गटातील उमेदवार ठेवून इतर गटात माघार घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले. नारायणगाव गटात शेरकर आशाताई यांना छुपी मदत करणार, तर ताई शेरकर यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील धालेवाडी गटात मदत करणार.आमदार सोनवणे सत्यशील शेरकर यांना पाडळी गटात मदत करणार, तर शेरकर त्यांना ओतूर गटात मदत करणार, अशी जोरदार चर्चा या गटात रंगत होती. तसेच, येणेरे गावातील राष्ट्रवादीच्या माजी प्रमुख नेत्याने तर मतदानाच्या अदल्या रात्री सेनेला मदत करण्याचे फोन केल्याची जोरदार चर्चा झाली; परंतु पक्षाचे कट्टर कार्यकर्ते ही समीकरणे मानण्यास तयार नाहीत. आपल्याच पक्षाचा उमेदवार विजयी होणार असल्याच्या खात्रीने ते पैजा लावल्या जात आहेत. (वार्ताहर)