शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटक सुखरुप असल्याचा कंपन्यांचा दावा

By admin | Updated: April 26, 2015 01:18 IST

नेपाळसह उत्तर भारतात विविध ठिकाणी गेलेल्या सहलींमधील सर्व पर्यटक सुखरुप असल्याचा दावा संबंधित पर्यटन कंपन्यांनी केला आहे.

पुणे : नेपाळसह उत्तर भारतात विविध ठिकाणी गेलेल्या सहलींमधील सर्व पर्यटक सुखरुप असल्याचा दावा संबंधित पर्यटन कंपन्यांनी केला आहे. तसेच काही कंपन्यांनी नेपाळला जाणाऱ्या सहली तेथील गंभीर परिस्थितीमुळे रद्द केल्या आहेत. उत्तर भारतातील सहली मात्र सुरळीतपणे चालू राहतील, अशी माहितीही कंपन्यांतर्फे देण्यात आली.नेपाळमध्ये झालेल्या तीव्र भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्तर भारतातही काही राज्यांत भूकंपाचा धक्का बसला. या भागात फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या नेहमीच जास्त असते. सध्याही काही पर्यटन कंपन्यांच्या सहली या भागात आहेत. वीणा वर्ल्ड या कंपनीचे महाराष्ट्रातील २८ पर्यटक नेपाळमध्ये आहेत. तर उत्तर भारतातील सिक्कीम, दार्जिलिंग, भूतान या भागात ४०० पर्यटक आहेत. नेपाळमधील सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती वीणा वर्ल्डच्या प्रमुख वीणा पाटील यांनी दिली. त्या म्हणाल्या, की भूकंपामुळे काठमांडूमध्ये जास्त नुकसान झाले आहे. भूकंप झाला तेव्हा सर्व २८ पर्यटक काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात होते. मात्र, या पर्यटकांना काहीही झाले नाही. त्यांच्याशी सातत्याने संपर्क सुरू आहे. अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींशी आम्हाला सतत सामोरे जावे लागते. हे सर्व पर्यटक आज (रविवारी) मुंबईत परतणार होते. काठमांडू विमानतळ बंद करण्यात आल्याने सध्या ते तिथेच राहतील. विमानतळ सुरू झाल्यानंतर त्यांना मुंबईत आणले जाईल. तसेच काही पर्यटक शनिवारी रात्री जाणार होते. उत्तर भारतातील सर्व सहली नियमितपणे सुरू राहतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)४केसरी टूर्सचे सुमारे २०० पर्यटक उत्तर भारत व नेपाळच्या सहलीसाठी निघाले होते. मात्र, भूकंपामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे नेपाळची सहल रद्द करण्यात आली आहे. या पर्यटकांना घेऊन नेपाळला जाणारे विमान लखनौमध्येच थांबविण्यात आले आहे. तेथून त्यांना थेट मुंबईत आणले जाईल. संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांचा यात समावेश आहे, असे केसरी टूर्सच्या पुणे कार्यालयातून सांगण्यात आले. ४गिरीकंद ट्रॅव्हल्सचे सुमारे ४०० पर्यटक दार्जिलिंग, सिक्कीम, आसाम या भागात आहेत. त्यामध्ये सुमारे १५० पर्यटक पुण्यातील आहेत. शनिवारी काठमांडूला १२ ते १५ जणांचा ग्रुप दिल्लीहून जाणार होता. मात्र, आता त्यांना परत बोलावण्यात आले आहे. उत्तर भारतातील सर्व पर्यटक सुखरुप आहेत, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक सचिन गोसावी यांनी दिली.