शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

नागरी उपद्रवाची पोलिसांनाही डोकेदुखी

By admin | Updated: May 19, 2014 00:45 IST

शहराच्या अफाट वाढलेल्या पसार्‍यात रस्त्यांवरच्या गुन्ह्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत असून त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे

पुणे : शहराच्या अफाट वाढलेल्या पसार्‍यात रस्त्यांवरच्या गुन्ह्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत असून त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. मद्याच्या नशेत भांडणे, हाणामार्‍या, अपरात्री फटाके फोडणे, कर्कश आवाजात लाऊडस्पीकर लावणे, वाहनांची मोडतोड अशा स्वरूपाच्या तक्रारी पोलीस नियंत्रण कक्षाकडे रात्री आठ ते बारा या वेळेत सर्वाधिक होताना दिसतात. शहराची हद्द वाढत गेल्यानंतर वस्ती प्रचंड वाढली. मानवी कलहांचे प्रमाणही वाढले आहे. पोलिसांची पूर्वीसारखी जरब राहिलेली नसल्याने मनमानी करणार्‍या प्रवृत्तींचे फावले आहे. विशेषत: गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी भर रस्त्यांत हाणामार्‍या करण्याचे, मद्यपान करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक मद्याच्या दुकानांसमोर सकाळपासून रात्रीपर्यंत मद्यपींची वर्दळ असते. नशेतून त्यांच्या भांडणांचे प्रकार होतात. पर्वती कालव्याच्या मोकळ्या जागी रात्री उशिरापर्यंत मद्यपींचे अड्डे जमलेले असतात. वेताळ टेकडीसह अनेक डोेंगरांवर मद्यपींची लगबग असल्याची उदाहरणे आहेत. भुरट्या चोरांनी भर रस्त्यात लूटमार करण्याचे प्रकारही होतात. ‘बोलबच्चन’ नामक टोळी बाहेरगावांहून आलेल्या एकाकी प्रवाशांना किंंवा स्थानिक नागरिकांना लुटते. मंगळसूत्र किंंवा सोनसाखळ्या खेचणार्‍यांना पोलिसांना चाप लावता आलेला नाही. भरदिवसाही असे प्रकार होत आहेत. नागरिकांमध्ये आत्मकेंद्रित वृत्ती असली तरी टोळक्यांमधील भांडणे, हाणामार्‍या, मद्याच्या नशेत धुडगूस, अपरात्री कोणाच्या तरी वाढदिवसानिमित्त किंंवा अन्य कोणत्या तरी सेलिब्रेशनसाठी फटाके फोडणे अशा प्रकारांमुळे असह्य मनस्ताप होऊ लागल्यावर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती कळविली जाते. अशा घटनांचा मागोवा घेण्यासाठी पोलीस जातात, मात्र ते पोहोचेपर्यंत घटनास्थळी सामसूम असते. अनेक प्रकारांमध्ये पोलीस वेगवान कारवाई करून दखल घेतात. मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. अशा प्रकारांमध्ये किती आरोपींवर कारवाई केली गेली, याची आकडेवारी पोलिसांकडे नाही. अलीकडे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवरचे सशस्त्र कमांडो असल्याने काही वेळातच घटनास्थळी पोलीस पोहोचतात, तरीही नागरी उपद्रवांचे प्रमाण चिंंताजनक आहे. उपनगरांमध्येच नव्हे मध्यवर्ती भागातही पहाटे एक ते दीडच्या सुमारास दणदणाटी फटाके फोडले जातात. रात्रपाळीला असलेल्या गस्तीवरच्या पोलिसांनी स्वत: होऊन अशा प्रकारांमध्ये कारवाई केल्याचे दिसून येत नाही. नागरिकांनी नियंत्रण कक्षाकडे तक्रार केल्यानंतरच दखल घेतली जाते. मात्र, आपले नाव उघड होऊन त्रास होईल, या भीतीने थेट पोलिसांकडे तक्रारी करण्यास नागरिक धजावत नाहीत. त्यामुळे रात्री दहानंतर फटाके फोडणार्‍यांवर किती खटले केले गेले, हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. मद्याच्या नशेत दोन टोळक्यांमध्ये होणार्‍या हाणामारीचे पर्यवसान दगडफेकीत, वाहनांची नासधूस करण्यात होते. कोथरूड, धनकवडी भागात असे प्रकार वारंवार होत आहेत. उपद्रवी टोळक्यांकडून सोसायट्यांतील वाहनांना आगी लावण्याचे प्रकार वाढत आहेत. (प्रतिनिधी)