शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना

By admin | Updated: October 14, 2015 03:36 IST

देवीला अभिषेक, श्रीसूक्त पठण, रुद्राभिषेक, महापूजा, नगारा वादनाचा निनाद, पवित्र मंत्रांच्या ध्वनीत पारंपरिक पद्धतीने

पुणे : देवीला अभिषेक, श्रीसूक्त पठण, रुद्राभिषेक, महापूजा, नगारा वादनाचा निनाद, पवित्र मंत्रांच्या ध्वनीत पारंपरिक पद्धतीने आज शहरात घटस्थापना करण्यात आली़ सार्वजनिक मंडळांनी मिरवणुका काढून देवीची प्रतिष्ठापना केली़ पावसाळा संपून शरद ऋतूच्या आगमनाची चाहुल देणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी गेल्या काही दिवसांपासून घरोघरी साफसफाई करून भाविकांनी तयारी केली होती़ आज सकाळपासून घराघरांत पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली़ शहरातील मंदिरांमध्ये सकाळी घटस्थापना केली गेली़ चतु:शृंगी मंदिरात सकाळी ९ वाजता घटस्थापना करण्यात आली़ त्याअगोदर सकाळी सहा वाजल्यापासून अभिषेक, श्रीसूक्त, रुद्राभिषेक, महापूजा करून देवीला महावस्त्र अर्पण करण्यात आले़ नारायण कानडे गुरुजी यांनी पौरोहित्य केले़ घटस्थापनेनंतर महाआरती करण्यात आली़ या वेळी देवीला हिऱ्याची नथ अर्पण करण्यात आली़ सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती़ भवानीमाता मंदिरात सकाळी रुद्राभिषेक व महापूजा करण्यात आली़ तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन झाले़ त्यानंतर ११ वाजता घटस्थापना करण्यात आली़ सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात सकाळी ८ वाजता डी़ वाय़ पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे अध्यक्ष डॉ़ पी़ डी़ पाटील आणि उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली़ विनायक देवळणकर यांच्या नगारावादनाने नवरात्रोत्सवास सुरुवात झाली़ मयूर बँड पथकाने मधुर वादनाने महालक्ष्मीच्या चरणी सेवा केली़ पूजेचे पौरोहित्य मिलिंद राहुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले़ या वेळी अध्यक्ष राजकुमार अग्रवाल, मुख्य विश्वस्त अमिता अग्रवाल, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, अ‍ॅड़ प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया उपस्थित होते़ पोलीस आयुक्त के़ के़ पाठक यांच्या हस्ते सायंकाळी विद्युत रोषणाई व गो ग्रीन थीम सजावटीचे उद्घाटन करण्यात आले़ शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदिरात उपमहापौर आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली़ पुणे लोकमान्य फेस्टिव्हलच्या देवीप्राणप्रतिष्ठापना स़ प़ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ दिलीप सेठ यांच्या हस्ते झाली़ या वेळी फेस्टिव्हलचे अध्यक्ष अ‍ॅड़ गणेश सातपुते, उत्सवप्रमुख नरेश मित्तल, उद्योजक आनंद आगरवाल, अशोक अगरवाल, शुभांगी सातपुते, महेश महाले आदी उपस्थित होते़ शहरात ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत मिरवणुका काढून देवीची स्थापना करण्यात आली़ अनेक ठिकाणी श्रीसूक्ताचे सामूहिक पठण आयोजित करण्यात आले होते़ (प्रतिनिधी)