शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ३९४ जागा मोबाईल कंपन्यांकडे

By admin | Updated: August 17, 2016 01:28 IST

शहरातील मोक्याच्या ठिकाणच्या तब्बल ३९४ जागा मोबाईल कंपन्यांना टॉवर उभारण्यासाठी देण्याचा विषय अखेर मंजूर करण्यात आला.

पुणे : शहरातील मोक्याच्या ठिकाणच्या तब्बल ३९४ जागा मोबाईल कंपन्यांना टॉवर उभारण्यासाठी देण्याचा विषय अखेर मंजूर करण्यात आला. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेतील मान्यता, त्यानंतर हाच प्रस्ताव निरस्त करण्याचा स्थायी समितीतील ठराव व पुन्हा एकदा सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी असा या प्रस्तावाचा ६ महिन्यांचा प्रवास अखेर संमतीमध्ये रूपांतरित झाला.पालिकेची मालमत्ता, जागा कोणाला द्यायची असेल तर त्यासाठी स्वतंत्र नियमावली आहे. त्या ठिकाणांचे व्यावसायिक दर अभ्यासण्यात येतात. या सर्व गोष्टी डावलून प्रशासनानेच या ३९४ जागांचा प्रस्ताव विशिष्ट मोबाईल कंपन्यांसाठी तयार केला होता. प्रस्ताव करून सहा महिन्यांपूर्वी प्रशासनाने तो स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला.माजी उपमहापौर आबा बागुल, नगरसेवक संजय बालगुडे व अन्य काही सदस्यांनी या ठरावाला विरोध केला. त्यानंतरही स्थायी समितीत या ठरावाला बहुमताने सर्वपक्षीय मान्यता मिळाली. मार्च २०१६च्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी आला. तिथे काही सदस्यांनी विरोध केल्यानंतर त्यांचा विरोध नोंदवून घेत प्रस्तावाला सर्वपक्षीय मान्यता मिळाली. त्यानंतर बालगुडे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यामुळे महापौर प्रशांत जगताप यांनी या ठरावावर स्वाक्षरी करणे टाळले. तब्बल ६ महिने हा ठराव विनास्वाक्षरीच होता.दरम्यानच्या काळात स्थायी समितीच्या जून २०१६ च्या बैठकीत हा प्रस्ताव निरस्त (रद्द) करावा असा ठराव बहुमताने मंजूर झाला. हाच ठराव अंतिम मान्यतेसाठी १० जुलै २०१६ च्या सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेत ३८५ क्रमांकाने आला. सभेत ठराव चर्चेला आलाच नाही. (प्रतिनिधी)