शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना भासतेय नोटांची चणचण

By admin | Updated: May 8, 2017 03:15 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर आॅनलाइन व्यवहाराला चालना देण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनासह काही राजकीय पक्षांनीही घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नोटाबंदीच्या निर्णयानंतर आॅनलाइन व्यवहाराला चालना देण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनासह काही राजकीय पक्षांनीही घेतला होता. मात्र,‘एटीएम’मधून पैसे काढण्याची मर्यादा उठविल्यानंतर शहरातील एटीएममधून हवी तेवढी रक्कम काढून नागरिकांकडून रोखीने व्यवहार केले जात आहेत. परंतु, शहरातील बहुतेक ‘एटीएम’मध्ये खडखडाट असल्याने नागरिकांना पुन्हा एकदा नोटांची चणचण जाणवू लागली आहे.भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० व ५०० च्या जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. त्यानंतर नागरिकांनी रांगा लावून जुन्या नोटा बँकेत जमा केल्या. तसेच केवळ दोन हजाराची एक नोट मिळवण्यासाठी एटीएमसमोर लांबच लांब रांगा लावल्या. नोटाबंदीचा निर्णय घेऊन सहा महिने पूर्ण झाले आहेत. तरीही शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक एटीएममध्ये रक्कम नसल्याचे दिसून येत आहे. पैसे मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.एटीएममधून तीनपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास शुल्क आकारले जाते. त्यामुळे नागरिक एटीएममधून एकदाच अधिकाधिक रक्कम काढून घेतात. परिणामी एटीएममधील रक्कम लवकर संपते. त्यातच एटीएममधून वेळेवर पैसे मिळत नसल्याने काही व्यापारी बँकांमध्ये रक्कम जमा न करता दुकानात किंवा घरीच ठेवतात. त्यामुळे बँकांकडेही हव्या तेवढ्या प्रमाणात रोख रक्कम जमा होत नाही. शहरातील सर्वच एटीएममध्ये खडखडाट नसला तरी ज्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध आहेत, त्यात केवळ दोन हजार रुपयांच्याच नोटा आहेत. खूप कमी एटीएममध्ये नागरिकांना ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा मिळत आहेत.