शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

चोरट्याला बदडले

By admin | Updated: May 23, 2014 04:53 IST

पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीवर दिवसाढवळ्या डल्ला मारणार्‍या नागेश देवेंद्र गिलबिले (वय २९, रा. दत्तनगर, चिंचवड) याला नागरिकांनी पकडून चांगलेच बदडले

पिंपरी : पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीवर दिवसाढवळ्या डल्ला मारणार्‍या नागेश देवेंद्र गिलबिले (वय २९, रा. दत्तनगर, चिंचवड) याला नागरिकांनी पकडून चांगलेच बदडले. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार गुरुवारी दुपारी पिंपरीतील गोकुळ हॉटेलसमोर घडला. याप्रकरणी लक्ष्मी रितेश कंदारे (रा. लिंक रोड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. निर्ढावलेल्या चोरट्यांना भीतीच राहिलेली नाही. दिवसाढवळ्याही चोरीचे प्रकार घडत असल्याने महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अशाच एका सोनसाखळी चोरट्याला गुरुवारी नागरिकांनी चांगलाच धडा शिकविला. कंदारे यांचे पती एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पतीच्या आजाराने अगोदरच तणावात असलेल्या कंदारे यांच्यासमोर गुरुवारी आणखी एक संकट उभे राहिले. रुग्णालयासमोरील एका दुकानात त्या पिण्याच्या पाण्याची बाटली आणण्यासाठी जात होत्या. त्याच वेळी नागेशने रस्त्यातच कंदारे यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढली. मात्र, सोनसाखळी गळ्यातच अडकली. दरम्यान, घाबरलेल्या कंदारे यांनी आरडाओरडा करताच पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागेशला परिसरातील नागरिकांनी पकडले. रंगेहाथ सापडलेल्या नागेशला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. याबाबत कंदारे यांनी पोलीस नियंत्रण कक्षास कळविताच काही क्षणांतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नागेशला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेत कंदारे यांच्या गळ्याला किरकोळ जखम झाली. पिंपरी पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून नागेशला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)