शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कन्हेरीतील चव्हाणवस्तीवर दरोडा

By admin | Updated: December 16, 2014 04:30 IST

कन्हेरी (ता. बारामती) येथील चव्हाणवस्तीवर दरोडेखोरांनी दरोडा टाकून १७ तोळे सोने, ५० हजार रोख रकमेसह पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला़

काटेवाडी : कन्हेरी (ता. बारामती) येथील चव्हाणवस्तीवर दरोडेखोरांनी दरोडा टाकून १७ तोळे सोने, ५० हजार रोख रकमेसह पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला़ या वेळी दरोडेखोरांच्या मारहाणीत आई व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. दरोड्याची ही घटना रविवारी (दि. १४) रात्री १० वाजण्याच्या दरम्यान घडली़ दरोडेखोरांच्या मारहाणीत बाळासाहेब चव्हाण आणि त्यांच्या आई भागूबाई चव्हाण हे जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर बारामतीमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले़ कन्हेरी गावापासून २ किलोमीटर अंतरावर चव्हाणवस्ती आहे़ चव्हाण कुटुंबीय रात्री जेवण करून झोपण्याच्या तयारीत होते़ राजेंद्र चव्हाण हे रिक्षाचालक असून, ते व्यवसायासाठी बारामतीत होते़ राजेंद्र चव्हाण यांची पत्नी सुनंदा, तीन मुली, एक मुलगा व सासू भागुबाई यांच्यासह झोपल्या होत्या. रात्री १० वाजण्याच्या सुमारास कटावणीने दरवाजा उघडून २० ते २५ दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. दरोडेखोर १८ ते २५ वयाचे होते़ दरवाजा मोडण्याचा आवाज आल्यामुळे चोरटे घरात शिरले असल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्या वेळी त्या मोबाईलवरून पती राजेंद्र यांना फोन लावण्याचा प्रयत्न करू लागल्या़ ते पाहून दरोडेखोरांनी घरातील सर्व मोबाईल फोडून टाकले. दरोडेखोरांच्या हातामध्ये तलवार, सत्तूर, चाकू, सुऱ्या, लोखंडी गज होते. त्यांनी या कुटुंबीयांना धमकावले. त्याला बाळासाहेब चव्हाण यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर चिडलेल्या दरोडेखोरांनी तलवारीने बाळासाहेब चव्हाण यांच्या पाठीवर वार केला. तसेच बाळासाहेब यांच्या आई भागूबाई यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. हे पाहून घाबरलेल्या सुनंदा चव्हाण यांनंी दरोडेखोरांना ‘मी तुमच्या पाया पडते. सोने-नाणे पैसे घेऊन जा; पण कुटुंबाला मारहाण करू नका’अशी विनवणी केली. दरोडेखोरांनी पायातील पैंजण, जोडवी, कानातील झुबे, रिंग्स, फु ले आदी दागिने ओरबाडण्यास सुरुवात केली. त्या त्रासाने महिला ओरडू लागल्या. ‘इजा होत आहे, सर्व दागिने काढून देतो,’ असे सांगू लागल्या. त्यांनी आपले दागिने काढून दिले. त्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा कपाट्यातील दागदागिन्यांकडे वळविला आणि घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फे कण्यास सुरुवात केली.शेतीच्या मशागतीसाठी आणलेले राजेंद्र चव्हाण यांचे २० हजार रुपये रोख, तर पाइपलाइनसाठी जमा केलेले बाळासाहेब चव्हाण यांचे ३० हजार रुपये व घरातील १० तोळे सोने दरोडेखोरांनी हिसकावले. (वार्ताहर)