शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून पडून चिमुरडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : इमारतीखाली भाजी आणण्यासाठी गेलेल्या आईला खाली वाकून पाहत असताना गॅलरीतून तोल जाऊन तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : इमारतीखाली भाजी आणण्यासाठी गेलेल्या आईला खाली वाकून पाहत असताना गॅलरीतून तोल जाऊन तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोथरूडमधील महात्मा सोसायटीत घडली. अविष्का ही आई-वडिलांना एकुलती एक मुलगी होती. तिच्या जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अविष्का विशाळ कोळपकर (वय ३ असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील वृंदावन पार्कमधील महात्मा सोयायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर कोळपकर कुटुंबीय राहतात. त्यांना तीन वर्षांची मुलगी अविष्का होती. रविवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अविष्काच्या आईला भाजी आणण्यासाठी खाली जायचे होते. त्यावेळी अविष्का घरात खेळत होती. त्यामुळे त्यांनी तिला घरातच थांबण्यास सांगितले. खाली जाऊन येत असल्याचे सांगितले. त्या घराचा दरवाजा बाहेरून लॉक करून खाली गेल्या. काही वेळानंतर अविष्का आई आली का हे पाहण्यासाठी गॅलरीत गेली. ती गॅलरीतून खाली वाकून पाहत होती. खाली पहात असताना अचानक तिचा तोल गेल्यामुळे ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.