शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातून सावरलेल्या बालकांना ‘एमएसआयसी’चा धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:09 IST

पुणे : कोरोनाची लागण झालेल्या मुलांमध्ये या आजारातून बाहेर पडल्यानंतर ‘मल्टिसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम’ (एमएसआयसी) हा आजार होत असल्याचे दिसून ...

पुणे : कोरोनाची लागण झालेल्या मुलांमध्ये या आजारातून बाहेर पडल्यानंतर ‘मल्टिसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम’ (एमएसआयसी) हा आजार होत असल्याचे दिसून आले आहे. बऱ्याचदा कोरोनामुक्तीनंतर काही आठवड्यांनी या आजाराची लक्षणे जाणवतात.

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्ग जास्त झाला. लाट काहीशी ओसरत असताना कोरोना पश्चात आजार समोर येत आहेत. यापैकीच एक मल्टीसिस्टीम ‘इंफ्लमेटरी सिंड्रोम’ आहे.

बालरोगतज्ज्ञ डॉ. अंशु सेठी म्हणाल्या, “मल्टिसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम या आजारात तीव्र ताप येतो. वेळीच निदान न झाल्यास शरीरावर चट्टे उठणे, डायरिया, वारंवार शौचास होणे, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, श्वास घेता न येणे असा त्रास होऊ शकतो. याशिवाय कोरोनरी आर्टरीची समस्याही उद्भवू शकते. लहान मुलांना कावासाकी हा आजार होण्याची शक्यता असते. मुलांमध्ये याचे प्रमाण केवळ एक ते दोन टक्के इतकेच आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर पालकांनी लहान मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हा आजार कोणत्याही वयोगटातील लहान मुलांमध्ये होऊ शकतो. ज्या मुलांना आधीपासून कोणताही आजार असल्यास अशा मुलांना धोका अधिक संभवतो. नवजात बालकांमध्ये हा आजार फारच दुर्मिळ आहे.”

बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारीख म्हणाले, “कोरोना होऊन गेल्यावर दोन ते पाच आठवड्यांनी या आजाराची लक्षणे दिसू लागतात. सहा वर्षाखालील मुलांच्या तुलनेत ६ ते १२ वर्षे वयोगटात या आजाराचे प्रमाण दुप्पट, आणि १२ ते १८ या वयोगटात अर्थात किशोरवयीन मुलांमध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आहे. मध्यम स्वरूपाच्या आजारासाठी स्टेरॉइड्स दिली जातात, तीव्र स्वरूपाच्या आजारात इम्युनोग्लोब्युलिन हे औषध आणि इतर उपचार केले जातात.”

चौकट

कोरोनातून बरे झाल्यानंतर मुलांना काही आठवड्यानंतर तीव्र ताप येणे, श्वास घेण्यास अडचण येत असल्यास, भूक लागत नसेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक रक्ताची आणि कोविड अँटिबॉडी चाचणी करून घ्या. कोरोनामुक्तीनंतर लहान मुलांना कोणताही आजार होऊ नये, यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात योग्य तो बदल करा. मुलांच्या झोपेच्या वेळा, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायामाकडे लक्ष द्या. सार्वजनिक ठिकाणी मुलांना फिरायला घेऊन जाणे शक्यतो टाळावे. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी मुलांना फ्लू लस देणे आवश्यक आहे.”

- डॉ. अंशु सेठी

चौकट

१ मार्च ते १६ जून या कालावधीत शहरात ० ते १८ वयोगटातील २६,४८८ मुलांना कोरोनाची बाधा झाली. शहरात सध्या २८४ मुले सक्रिय रुग्ण असून, ३६ जण ऑक्सिजनविरहित बेड, तर ८ जण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

चौकट

ही आहेत लक्षणे

-खूप ताप येणे. तो पाच दिवसांपर्यंत कमी न होणे. मुलांच्या पोटात सतत दुखणे.

-मळमळ, उलट्या होणे, त्वचेवर ‘रॅशेस’ पडणे.

-डोळे लाल होणे.

चौकट

ही घ्या काळजी

-मुलांना मास्कशिवाय बाहेर पडू देऊ नका.

-कुठलेही लक्षण आढळल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा.

-कोरोनातून बरे झालेल्या मुलांकडेही लक्ष ठेवा.