शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या प्रश्नांचे मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे

By admin | Updated: March 6, 2016 01:21 IST

केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित असलेल्या पुणे शहराच्या मेट्रोस मान्यता मिळावी, तसेच शहराच्या रखडलेल्या विकास आराखड्यास मंजुरी मिळावी

पुणे : केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित असलेल्या पुणे शहराच्या मेट्रोस मान्यता मिळावी, तसेच शहराच्या रखडलेल्या विकास आराखड्यास मंजुरी मिळावी, मुळशी धरणातून पाणी मिळावे, भामा आसखेडच्या योजनेत सवलत मिळावी, कचऱ्याच्या जागेचा प्रश्न मिटवावा आदी प्रश्नांच्या सोडवणुकीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन ती मार्गी लावावीत, अशी विनंती महापौर प्रशांत जगताप यांनी शनिवारी फडणवीस यांच्याकडे केली.शहरातील काही कार्यक्रमाच्या निमित्ताने फडणवीस शनिवारी पुण्यात आले होते. प्रशांत जगताप यांनी या वेळी फडवणीस यांना पुण्याच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन देऊन ते लवकर मार्गी लावण्याची विनंती केली. शहराची झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता या प्रश्नांची सोडवणूक लवकर होणे आवश्यक असल्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. पुणे शहरातील मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा आराखडा अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे. त्याचबरोबर मेट्रो आराखडाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या कंपनीलाही अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामध्ये राज्य शासनाने लक्ष घालावे. शहराचा जुन्या हद्दीचा विकास आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्याला मंजुरी द्यावी. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराला मुळशी धरणातून पाणी मिळावे. भामा आसखेड योजनेचा १६२ कोटी रुपयांचा सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ करावा, अशी मागणी केली.कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पिंपरी सांडसची जागा देण्याची प्रक्रिया लवकर पार पाडावी. उरुळी व फुरसुंगी येथील कचरा प्रकल्प बाधितांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र मिळावे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासाठी केंद्राकडून मंजूर झालेले १७१ कोटी रुपये अद्याप मिळालेले नाही. पावसाळी गटारी योजना कार्यान्वित करण्यासाठी ४६१ कोटी रुपयांचा निधी आणि बीआरटीएस अंतर्गत आयटीएमएस प्रकल्पासाठी ३५ कोटी रुपये मिळावेत.सार्वजनिक टीडीआर अन्वये ताब्यात घेतलेल्या मिळकतींसाठी मुद्रांक शुल्क माफ व्हावे. नदी सुधारणाच्या जायका प्रकल्पांतर्गत कामांना गती मिळावी. थकीत असलेले अनुदान मिळावे. स्मार्ट सिटी योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ती मदत मिळावी आदी मागण्या जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.