शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

न्हावरा-शिरूर गटात चुरस

By admin | Updated: February 15, 2017 01:51 IST

पुणे जिल्हा परिषदेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये न्हावरा-शिरूर ग्रामीण या जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत चुरशीचा सामना रंगला असून

निमोणे : पुणे जिल्हा परिषदेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये न्हावरा-शिरूर ग्रामीण या जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत चुरशीचा सामना रंगला असून, या लक्षवेधी निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. नवीन गट पुनर्रचनेनुसार पूर्वीच्या न्हावरा -रांजणगाव सांडस व शिरूर ग्रामीण रांजणगाव गणपती या दोन गटांचा काही भाग मिळून हा नवा गट तयार करण्यात आला आहे.शिरूर-हवेलीचे विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे व सदस्या मनीषाताई कोरेकर, माजी सदस्य काकासाहेब कोरेकर, माजी सदस्या मंदाताई सरके, शिरूर पंचायत समितीचे सभापती सिद्धार्थ कदम, उपसभापती मंगल लंघे, माजी सभापती बाजीराव कोळपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिलीप हिंगे, घोडगंगाच्या आजी-माजी संचालकांसह अनेक दिग्गजांचा हा मतदार संघ. शिवाय तालुक्याच्या सहकाराचा केंद्रबिंद असणारा घोडगंगा याच गटात! त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या तालुक्यात असणाऱ्या सात जागांपैकी ही एकमेव जागा सर्वसाधारण पुरुष या वगार्साठी खुली असल्याने तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य राहुल पाचर्णे ( भाजपा), करडे गावचे माजी आदर्श सरपंच राजेंद्र जगदाळे ( राष्ट्रवादी ), शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख अनिल पवार (शिवसेना), कळवंतवाडीचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष कोळ्पे( काँग्रेस आय.), तालुका कामगार आघाडीचे माजी पदाधिकारी रवींद्र निंबाळकर ( अपक्ष ) हे पाच जण निवडणूक रिंगणात आहेत.सामना पंचरंगी असला, तरी खरी लढाई भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच खरी लढत होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.राहुल पाचर्णे हे गतपंचवार्षिक मधील कामाचा अनुभव, सत्तेवर असणारा पक्ष व आमदार वडिलांच्या पाठबळावर निवडणूक लढवत आहेत. तर राजेंद्र जगदाळे हे करडे गावचे सरपंच असताना गावातील विकासकामे, युवकांचे संघटन व राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच दिग्गजांच्या बळावर नशीब अजमावत आहेत. शिवसेनेचे अनिल पवार यांचे ग्राहक कक्षाच्या माध्यमातून कार्य आहे.कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष कोळपे व अपक्ष रवींद्र निंबाळकर यांचेही स्थानिक पातळीवर कार्य आहे.सध्या सर्वच पक्षांकडून प्रचाराचा धुराळा उडत आहे. नोटबंदी, कांद्यासह शेतीमालाचे पडलेले भाव, चासकमानचे पाणी, सहकाराचे खासगीकरण, स्थानिक प्रश्न इ. च्या भोवती निवडणूक फिरत आहे. कोपरा सभा, घोंगडी बैठका, वैयक्तिक भेटीगाठीच्या माध्यमातून प्रचाराची राळ उडत असून जाहीर सभांमधून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. प्रत्येक उमेदवार विजयाचा दावा करत आहे. मात्र, त्यासाठी मतदारांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. (वार्ताहर)