शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

केमिकलयुक्त विषारी धुराने मरकळकरांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:10 IST

-- शेलपिंपळगाव : मरकळ (ता. खेड) गावच्या हद्दीतील औद्योगिक वसाहतींमधील सहा ते सात खासगी कंपन्यांमधून केमिकलयुक्त तसेच विषारी धूर ...

--

शेलपिंपळगाव : मरकळ (ता. खेड) गावच्या हद्दीतील औद्योगिक वसाहतींमधील सहा ते सात खासगी कंपन्यांमधून केमिकलयुक्त तसेच विषारी धूर हवेत सोडला जात आहे. विशेष म्हणजे खुलेआम हवेत सोडल्या जाणाऱ्या धुरावर कुठलीही प्रक्रिया केली जात नाही. परिणामी विषारी धुरामुळे गावातील तसेच कंपनीलगतच्या स्थानिक रहिवाशांचे, तसेच पाळीव प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित सर्व खासगी कंपन्यांनी तत्काळ उपाययोजना करून विषारी धुराचा प्रश्न मार्गी लावावा; अन्यथा ‘त्या’ सर्व कंपन्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

आळंदीलगत असलेल्या मरकळ ग्रामपंचायत हद्दीत औद्योगिक वसाहतींचे मोठे जाळे पसरले आहे. गावच्या पूर्वेकडील बाजूला बहुतांशी मोठं-मोठे कारखाने विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करत आहे. त्या कारखान्यातून विषारी धूर हवेद्वारे वातावरणात पसरला जाऊन गावातील नाणेकरवस्ती, पाटीलवस्ती, वर्पेवस्ती तसेच गावाला प्रदूषित करत आहे. या धुरामुळे स्थानिक नागरिकांना विविध प्रकारचे आजार जडू लागले आहेत. तसेच अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. केमिकलयुक्त धुराच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील पिकांच्या उत्पादनावरही परिणाम झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या विरोधात नाणेकरवस्ती, पाटीलवस्ती तसेच वर्पेवस्तीवरील रहिवाशांनी संबंधित कंपन्यांविरोधात ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

या पार्श्वभूमीवर सरपंच भानुदास लोखंडे, उपसरपंच संतोष भुसे आदींनी शनिवारी (दि. २२) संबंधित सर्व कंपन्यांची पाहणी करून ‘त्या’ कंपन्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. संबंधित कंपन्यांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

--

डोळ्यांचा व श्वसनाचा त्रास

आधीच कोरोना संसर्गाने हैराण झालेल्या मरकळकरांना आता खासगी कंपन्यांमधून निघणाऱ्या विषारी धुराचा सामना करावा लागत आहे. केमिकलयुक्त धूर असल्याने त्याचा उग्र वास येत असून डोळ्यांत पाणी येत आहे. परिणामी नागरिकांना श्वसनाचा त्रास उद्भवू लागला आहे. काही कंपन्या धुरावर प्रक्रिया केल्याचे सांगत आहेत. मात्र, हे खोटे बहाणे असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

--

फोटो क्रमांक : २२ शेलपिंपळगाव विषारी धूर

फोटो ओळ : मरकळ (ता. खेड) हद्दीतील खासगी कंपन्यांमधून हवेत पसरला जाणारा केमिकलयुक्त विषारी धूर.