शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर असल्याची बतावणी करून फसवणूक

By admin | Updated: May 22, 2014 06:00 IST

डॉक्टर असल्याची बतावणी करून २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने आरोपीला १ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला

पुणे : डॉक्टर असल्याची बतावणी करून २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने आरोपीला १ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अमित जगन्नाथ कांबळे (वय २४, रा. नवी पेठ, निंबाळकर वाडा, मनपा शाळेच्या मागे) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी योगेश अनंता तळेकर (वय २८, रा. धुमाळनगर, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना ५ मे रोजी दुपारी ४.३० वाजता घडली होती़ फिर्यादी यांना मोबाईलवर फोन आला व ‘डॉ. देशपांडे बोलत असून, भारती हॉस्पिटल येथील तुमच्या पेशंटच्या आॅपरेशनसाठी २० हजार रुपये आवश्यक आहेत,’ असे सांगितले. फिर्यादी या रक्कम घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांचा माणूस असल्याचे सांगून एक जण रक्कम घेऊन गेला. त्यानंतर प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये आॅपरेशनसाठी डॉक्टर न आल्याने याबाबत फिर्यादी यांनी चौकशी केली असता, देशपांडे नावाचे कोणीही डॉक्टर नसल्याचे त्यांना कळाले व त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्याकडून फिर्यादीचे २० हजार रुपये हस्तगत करायचे आहेत, भारती विद्यापीठ परिसरात आणखी काही गुन्हे केले आहेत का, याबाबत तपास करायचा आहे यासाठी पोलीस कोठडी देण्यात यावी, असा सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.(प्रतिनिधी)