शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ओएलएक्सवर जाहिरात देऊन एकाची फसवणूक

By admin | Updated: March 9, 2017 23:24 IST

ओएलक्स' या संकेस्तस्थळावर मोटार विक्रीची जाहीरात देऊन सहा जणांनी एका तरुणाची 5 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक

ऑनलाइन लोकमत पिंपरी, दि. 9 - ओएलक्स' या संकेस्तस्थळावर मोटार विक्रीची जाहीरात देऊन सहा जणांनी एका तरुणाची 5 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी निरज मेहरा (वय 27, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी त्यांनी वाकड पोलिसांत संतोष कुमार सिंग (उत्तर प्रदेश), खोरा पुई (दिल्ली), कृष्णाप्पा पी याच्यासह इतर तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नीरज मेहरा यांना नवीन मोटार खरेदी करायची होती. आरोपींनी मोटार विक्रीची जाहीरात ‘ओएलएक्स’वर दिली होती. निरज मेहरा यांनी आरोपींशी संपर्क साधला. समोरील व्यक्ती आणि निरज यांच्यामध्ये साडेपाच लाख रुपयांमध्ये व्यवहार झाला.  
आरोपींनी मोटार पुणे, विमानतळावर असून सीमा शुल्क विभागाच्या अधिका-यांच्या ताब्यात आहे. त्यांना 32 हजार रुपये देऊन ती सोडवून घ्या, असे दूरध्वनीवरून नीरज यांना सांगितले. नीरज यांनी बोगस सीमा शुल्क अधिकारी संतोष कुमार सिंग याच्या खात्यावर 20 सप्टेंबरला 32 हजार रुपये जमा केले. 
ओएलएक्सवर जाहिरात देणा-यांनी पुन्हा नीरज यांच्याशी संपर्क साधला आणि पैशांची मागणी केली. नीरज यांनी खोरो पुई याच्या बँक खात्यात 21 सप्टेंबर 2016 रोजी तब्बल पाच लाख 15  हजार रुपये जमा केले. त्यानंतर विमानतळावर गाडी घेण्यासाठी नीरज तेथे गेले. मात्र, विमानतळावर अशा नावाचे कुणी सीमा शुल्क अधिकारी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. 
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निरज यांनी पोलिसांत धाव घेतली आणि आरोपींविरोधात फिर्याद दिली.