शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चाळकवाडीत रुंदीकरण पाडले बंद

By admin | Updated: November 22, 2015 03:31 IST

पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणासाठी विरोध अजून सुरूच आहे. ज्या बाधित शेतकऱ्यांच्या अतिरिक्त जमिनी संपादित केल्या आहेत. त्यांची प्रथम मोजणी करून नुकसानभरपाई

पिंपळवंडी : पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणासाठी विरोध अजून सुरूच आहे. ज्या बाधित शेतकऱ्यांच्या अतिरिक्त जमिनी संपादित केल्या आहेत. त्यांची प्रथम मोजणी करून नुकसानभरपाई द्या, अशी मागणी करीत शनिवारी चाळकवाडी येथील ग्रामस्थांनी पुन्हा काम बंद पाडले.राजगुरुनगर ते सिन्नर या दरम्यान महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी साठ मीटर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना तशा नोटिसाही देण्यात आल्या आहेत. परंतु, चाळकवाडी येथे प्रस्तावित टोलनाका असल्याकारणाने शेतकऱ्यांची फसवणूक करून अतिरिक्त जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. ज्या अतिरिक्त जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्या जमिनींच्या शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या नाहीत. असे असतानाच काम सुरू करण्यात आले आहे. साठ मीटरमध्येच टोलनाका करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. असे असतानाही साठ मीटरपेक्षा जास्त जमीन संपादित करण्यात का आली? असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांनी काम बंद पाडले होते. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या अतिरिक्त जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्या जमिनीची मोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या वेळी आठ दिवसांत तुमच्या जमिनीची मोजणी करून देऊ, महामार्गावर काम बंद करू नका, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना काम करू दिले. मात्र, आठ दिवसांनंतर तुमच्या जमिनी तुम्हीच मोजा, असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.शनिवारी (दि. २१) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बाधित शेतकरी आणि महिलांनी पुन्हा काम बंद केले. आमच्या अतिरिक्त संपादित केलेल्या जमिनी मोजून द्या. ज्या क्षेत्राच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत तेवढेच क्षेत्र संपादित करा. तसेच नुकसानभरपाई देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. आता काहीही झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. आम्हाला कुठे न्यायचे तिकडे न्या. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. (वार्ताहर)टोलनाका होता तेथेच?पूर्वी ज्या ठिकाणी टोलनाका होता त्या ठिकाणी लोकवस्ती आणि शाळा असल्याचे कारण देत हा टोलनाका पाचशे मीटर अंतरावर पुढे घेण्यात आला. परंतू हा टोलनाका चाळकवाडी गावच्या हद्दीतच नको, अशीच मागणी प्रथमपासून आहे. असे असतानाही हा टोलनाका अवघ्या पाचशेच मीटर अंतरावर घेण्याचे कारण काय? ज्या ठिकाणी टोलनाका होणार आहे त्या ठिकाणीही लोकवस्ती आहेच ना? मग हा टोलनाका पाचशे मीटर अंतरावर पुढे घेण्याचे नाटक कशासाठी? त्यापेक्षा हा टोलनाका पहिला ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी घेण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे.