शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरट्यास पाठलाग करून पकडले

By admin | Updated: June 13, 2014 05:04 IST

सोनसाखळी चोरून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या वचन लक्ष्मण गोसावी (वय ३०, रा. लोहकरे चाळ, बोपखेल) या चोरट्याला नागरिक व पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

पिंपरी : सोनसाखळी चोरून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या वचन लक्ष्मण गोसावी (वय ३०, रा. लोहकरे चाळ, बोपखेल) या चोरट्याला नागरिक व पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास जुनी सांगवीतील गजाननमहाराज मठासमोरील महापालिका शाळेजवळील रस्त्यावर घडली. याप्रकरणी संगीता कोंडिबा चोरघे (वय ४०, नवनाथ अपार्टमेंट, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरघे रस्त्याने पायी जात होत्या. दरम्यान, समोरून वचन त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन सोनसाखळ्या हिसकाविल्या. त्यानंतर सरकारी दवाखान्याच्या दिशेने आरोपी पळून जात असतानाच चोरघे यांनी आरडा-ओरडा केला. चोरीचा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आरोपीचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, आरोपी वचन याने नागरिकांच्या दिशेने दगड फेकून मारला. हा प्रकार सुरू असतानाच एका नागरिकाने पोलिसांना कळविले. काही वेळातच त्या ठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी जिगर पाटील व निखिल अशोक गाडुते या नागरिकांच्या मदतीने आरोपीचा पाठलाग केला. अखेर आरोपीला जुनी सांगवीतील बीएसएनएल कार्यालयाजवळ पकडून चोरलेला ऐवज हस्तगत केला. आरोपीला अटक केली असून, याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालकास लुटले; एकाला अटकपिंपरी : रस्त्यात ट्रक अडवून रहमतुल्ला अकबरसाहब अली (वय ३०, रा. धरमगट्टा, भद्रवती जि. सिमोगा, कर्नाटक) या चालकाकडील ऐवज चोरट्यांनी लुटला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, एकजण फरार आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास चिंचवडगावातील अहिंसा चौकात घडली. सागर अंकुश कानडी (वय २४, रा. संतोषनगर, चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (प्रतिनिधी)