शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

माजी अध्यक्षांच्या बंडखोरीचे आव्हान

By admin | Updated: February 13, 2017 01:30 IST

तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात दिग्गजांनी बंडखोरी केली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे यांनी

बारामती : तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात दिग्गजांनी बंडखोरी केली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे यांनी वडगाव निंबाळकर - मोरगाव गटातून पक्षाने आयात उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोमणे यांची उमेदवारी कायम राहणार का, हे माघारीच्या दिवशी कळेल. मात्र, त्यांनी एका पत्रकाद्वारेच उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर याच गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनील भगत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. हा गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या गटातून माळी समाजाला उमेदवारी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. या गटातून वडगाव निंबाळकरचे माजी सरपंच सुनील ढोले यांनी याच अनुषंगाने उमेदवारी पक्षाकडे मागितली होती. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब करे यांच्यासह तब्बल २७ जणांनी या गटातून उमेदवारी मागितली होती. मात्र, नीरावागजचे रहिवासी असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वासराव देवकाते यांना या गटातून पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे गटातील स्थानिक इच्छुकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. खोमणे यांनी तर २७ इच्छुकांमधून एकही स्थानिक, सक्षम उमेदवार पक्षाला मिळाला नाही का, असा प्रश्न पक्षनेत्यांना विचारला आहे. खोमणे यांची बंडखोरी डोकेदुखी मानली जात आहे. विविध पदांवर काम केल्यामुळे त्यांना मानणारा वर्गदेखील मोठा आहे. खोमणे यांच्यासह तीन बंडखोरांचे आव्हान देवकाते यांना आहे. त्याचबरोबर भाजपाने माणिकराव काळे हे स्थानिक उमेदवार दिल्याने लढत चुरशीची होईल. यापूर्वी देवकाते भाजपाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांना उमेदवारी देताना जातीय समीकरणाचा विचार पक्षनेत्यांनी केल्याचे चित्र आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. डोर्लेवाडी - सांगवी गटातील राजकीय खेळीसाठी त्यांनी वडगाव निंबाळकर - मोरगाव गटातून संधी देण्यात आली. मात्र, मागील ३५ ते ४० वर्षांपासून शरद पवार यांचे कट्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीश खोमणे यांनी या गटात आव्हान दिले. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे पत्रकदेखील त्यांनी गटात वाटले आहे. शरद पवार यांनी समजूत काढल्यावर ते माघार घेतील, अशी चर्चा राष्ट्रवादीमध्ये आहे. परंतु पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून काम केलेल्या खोमणे यांनी गटातील इच्छुकांना डावलून ‘आयात’ उमेदवार दिल्याने स्वाभिमान जपण्यासाठी बंडखोरी केली आहे. त्यांनी कोऱ्हाळे येथे घेतलेल्या प्रचारसभेत ग्रामस्थांनीच निवडणुकीसाठी लोकवर्गणी दिली. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला अधिक महत्त्व आले आहे. याच गटातून सुनील भगत यांनीदेखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सुनील ढोले यांनीदेखील बंडखोरी केली आहे. या गटात भाजपा-रासपच्या चर्चेत रासपसाठी जागा सोडण्यात आली. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यानंतर रासपाचे तालुकाध्यक्ष माणिक काळे यांनाच भाजपाने उमेदवारी दिली. त्यामुळे रासपामध्ये नाराजी आहे. तसेच गणातील जागेवरदेखील भाजपाने उमेदवार दिला. जागा वाटपानंतर सोडलेल्या जागांवर भाजपाने खेळी केली.राष्ट्रवादीचे देवकाते यांच्याविरोधात बंडखोरी केल्यानंतरदेखील प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात पक्षनेते अजित पवार यांनी विशेष टिप्पणी केली नाही. याउलट काही वेळा बंडखोरी फायद्याचीदेखील असते, एखाद्या बंडखोर उमेदवारामुळे पक्षाला फायदा होणार असेल, विरोधकांना तोटा होत असेल, अशा बंडखोरांकडे दुर्लक्ष करा, असे विधान कन्हेरीत केले. याचा अर्थ काय घ्यायचा, याचा विचार पक्ष कार्यकर्ते आणि विरोधक करीत आहेत.