शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराच्या ओझ्याचे आव्हानच

By admin | Updated: November 12, 2015 02:37 IST

शाळांना शनिवारपासून दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत असून, आता शाळा २३ तारखेलाच उघडणार आहेत. या सुट्ट्यांनंतर मिळणाऱ्या अवघ्या आठवड्यात मुख्याध्यापक दप्तराचे

पुणे : शाळांना शनिवारपासून दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत असून, आता शाळा २३ तारखेलाच उघडणार आहेत. या सुट्ट्यांनंतर मिळणाऱ्या अवघ्या आठवड्यात मुख्याध्यापक दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणार आणि त्या कशा राबवणार? प्रत्येक गोष्टीसाठी मुख्याध्यापकच कसा जबाबदार राहणार? असा सवाल विचारून मुख्याध्यापकांनी शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध केला. राज्य शासनाने दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत कार्यवाहीसाठी शाळांना ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत शाळांनी दप्तराचे ओझे कमी करण्यावर उपाययोजना न केल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व नियामक मंडळाने ठरविलेल्या संचालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे परिपत्रक काढले. त्यामुळे मुख्याध्यापकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा भार कमी करण्यासाठी न्यायालयाने उपाययोजना सुचविल्या असून, दप्तराचे प्रमाणही ठरवून दिले आहे. मुलांच्या वजनाच्या १० टक्यांपेक्षा कमी दप्तराचे ओझे असावे, असा निकष ठरवून दिला आहे. विविध उपाय सांगून शासनाने २१ जुलै रोजी शासन निर्णय जाहीर केला होता. मात्र, वेळोवेळी सूचना देऊनही विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी होत नसल्याने शासनाने पुन्हा ३० नोव्हेंबरपर्यंत कार्यवाहीचा आदेश दिला आहे. मात्र, मुळातच प्राथमिक व माध्यमिक शाळांना ८ ते २२ नोव्हेंबर दिवाळी सुट्टी असणार आहे. त्याच दरम्यान राज्य शासनाने नवे परिपत्रक काढून, दप्तराचे ओझे कमी करण्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहे. शासनानी सुचविलेल्या उपाययोजनांची शाळांनी ३० पर्यंत अंमलबजावणी करणे अनिवार्य केले आहे. मात्र, सुट्ट्यांचा कालावधी आणि सातत्याने मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्याच्या शासनाच्या या निर्णयामुळे मुख्याध्यापकांमध्ये नाराजीचा सूर आहे.मुख्याध्यापक संघाचे राज्याचे अध्यक्ष अरुण थोरात म्हणाले, ‘‘शनिवारपासून दिवाळी सुट्टी आहे. १५ दिवस सुट्ट्यांतच जाणार. अशा परिस्थितीत ३० नोव्हेंबरपर्यंत दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी कार्यवाही करणे शक्य नाही. ही कार्यत्वाही पूर्ण न करणाऱ्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरणे चूकच आहे.’’