शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गड राखण्याचे जगताप, काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे आव्हान

By admin | Updated: May 19, 2014 02:04 IST

मोदी लाटेचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. या लाटेचे पडसाद काही महिन्यांतच होणार्‍या चिंचवड विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

पिंपरी : मोदी लाटेचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. या लाटेचे पडसाद काही महिन्यांतच होणार्‍या चिंचवड विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. लोकसभेनंतर मोदी लाटेची जादू कायम राहणार की, अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा हा गड राखण्यात यश मिळणार, पूर्वाश्रमीचा असणारा काँग्रेस व राष्टÑवादीचा गड कायम ठेवण्यात कितपत यश मिळणार हा खरा प्रश्न आहे. यात राष्टÑवादी आणि शिवसेना नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सध्या तरी इच्छुकांनी विधानसभेची तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका निवडणुकीत या मतदारसंघातून चित्र दर वेळी वेगळे असते. चिंचवड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्टÑवादीचे नगरसेवक, पदाधिकारी अधिक आहे. त्यापाठोपाठ शिवसेना-भाजपची शक्ती या मतदारसंघात आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शेतकरी कामगार पक्षाची निर्माण झालेली ताकद पुढे कितपत राहणार, हे आमदार जगताप यांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे. २००९ च्या निवडणुकीत राष्टÑवादी बंडखोरास ७८,७४१, युतीला ७२,१६६ आणि काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसला २४,६८४ मते मिळाली होती. तर लोकसभा निवडणुकीत या विधानसभेतून शिवसेनेला १ लाख ३७ हजार ७७२ मते मिळाली, तर शेतकरी कामगार पक्षास (राष्टÑवादी बंडखोर) ७३ हजार ५२९, काँग्रेस राष्टÑवादीला १४ हजार ५२० मते मिळाली आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला वाढलेल्या मतांचा विधानसभेत किती होणार हा खरा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता कार्यकर्त्यांना विधानसभेचे वेध लागले आहे. इच्छुकांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. राष्टÑवादी आणि काँग्रेस आघाडी कायम राहिल्यास आणि मतदारसंघ काँग्रेसला मिळाल्यास भाऊसाहेब भोईर वा सचिन साठे यांना उमेदवारी मिळू शकते. राष्टÑवादीने तो आपल्याकडे ठेवल्यास विलास नांदगुडे, नाना काटे, हनुमंत गावडे यांचे नाव पुढे येऊ शकते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप राष्टÑवादीबरोबर राहतात, अपक्ष की शेकापच्या वतीने निवडणूक लढवितात, यावर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. लोकसभेच्या निमित्ताने शिवसेनेची ताकद वाढल्याने नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे कोणती भूमिका घेतात, यावरही शिवसेनेचा उमेदवार ठरणार आहे. शिवसेनेच्या वतीने राहुल कलाटे, मोरेश्वर भोंडवे, भगवान वाल्हेकर यांचे नाव पुढे येऊ शकते. राष्टÑवादीचा उमेदवार ठरविण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पक्षाला चिंचवडमध्ये मिळालेले अपयश पाहता किंवा शेकापला मिळालेली साथ पाहता, ते कोणाचे नाव पुढे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वेळी महाराष्टÑ नवनिर्माण सेना, आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्षही उमेदवार उतरवू शकतात.