शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात

By admin | Updated: February 20, 2017 02:40 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांत छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. या वेळी विविध

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांत छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. या वेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. काही ठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. रुपीनगर येथील नवमहाराष्ट्र विद्यामंदिर येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवरायांचे पराक्रम, हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आढावा आपल्या भाषणातून मांडला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद गौड उपस्थित होते. मोशीतील आदर्शनगर येथील यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित यशस्वी प्राथमिक माध्यमिक इंग्लिश मीडिअम विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आदर्शनगर, संघर्ष चौक, मोरया चौक, शिक्षक कॉलनी, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर, खानदेशनगर आदी परिसरात रॅली काढण्यात आली. सदाफ शेख, सिद्धार्थ कोरे, शुभम मोरे, सूरज पारखे, करण बिक, शरीफ शेख, यश हंडाळ यांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या. रुपीनगर, सहयोगनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर -महात्मा फुले ट्रस्टच्या ज्ञानप्रभात विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे यांनी शिवरायांचे कार्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल गवळी, सुमन गवळी, बाळासाहेब सावंत, मुख्याध्यापक राहुल गवळी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)