शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

लोकलच्या महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही

By admin | Updated: April 12, 2017 04:14 IST

पुणे-लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. लोकलमधील महिलांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय

पुणे : पुणे-लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. लोकलमधील महिलांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे महिलांंच्या डब्यातील हालचालींवर आता रेल्वे पोलिसांची करडी नजर असेल. लोणावळा लोकलच्या दररोज ४० तर पुणे-तळेगाव लोकलच्या ४ अशा दररोज एकूण ४४ फेऱ्या होतात. सुमारे सव्वा ते दीड लाख प्रवाशांना लोकलचा फायदा होतो. त्यामध्ये २० ते २५ हजार महिला प्रवाशांचा समावेश आहे. लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेडछाड, शिवीगाळ, पर्स, दागिने, मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने घडतात. याला आळा घालण्यासाठी महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सीसीटीव्ही खासदार अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीतून बसविले जाणार आहेत. सध्या लोकलमध्ये पहिला, शेवटचा आणि मधला डबा महिलांसाठी राखीव आहे. या डब्यात काही गोंधळ झाल्यास पुढच्या स्थानकावरील पोलीस मदतीला येतात. मात्र, डब्यात नेमका काय गोंधळ सुरू आहे, हे रेल्वे प्रशासन अथवा पोलिसांना कळत नाही. सीसीटीव्ही बसविल्यानंतर डब्यातील प्रत्येक हालचालीवर लक्ष राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असेल. पुणे विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक (वाणिज्य) कृष्णाथ पाटील म्हणाले, पुणे-लोणावळा लोकलमध्ये महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी महिला डब्यांमध्ये लवकरच सीसीटीव्ही बसविले जातील.