शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

पळून जाणार्‍या चोरट्याला पकडले

By admin | Updated: May 15, 2014 05:09 IST

येथील पोलीस प्रमोद उगले यांनी नागरिकांच्या मदतीने पळून जाणार्‍या एका मोटारसायकल चोराला गजाआड केले. सुरदेव रमेश नानावत (वय २१, रा.घोटावडे फाटा, ता. मुळशी)असे अटक केलेल्याचे नाव आहे.

तळेगाव दाभाडे : येथील पोलीस प्रमोद उगले यांनी नागरिकांच्या मदतीने पळून जाणार्‍या एका मोटारसायकल चोराला गजाआड केले. सुरदेव रमेश नानावत (वय २१, रा. घोटावडे फाटा, ता. मुळशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी - बुधवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास कॉन्स्टेबल प्रमोद उगले हे तळेगाव पोलीस ठाण्याकडे येत असताना, विकासनगर - किवळे येथील शिंदे पेट्रोल पंपासमोर मोटारसायकलवरील एक तरुण संशयास्पद हालचाल करताना दिसला. उगले यांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता, तो मोटारसायकलवरून पळून जाऊ लागला. ग्रामस्थांच्या मदतीने उगले यांनी त्याचा पाठलाग केला. सुरदेव हा मामुर्डी - सांगवडे रस्त्याने जात असताना, मोटारसायकल घसरल्याने खाली पडला. शेतातून पळू लागला असता उगले यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करून त्याला पकडले. दरम्यान, या मोटारसायकल चोरट्यास नागरिकांनी चोप दिला. मोटारसायकलबाबत व नाव, पत्ता विचारला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्यास देहूरोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सुरदेव रमेश नानावत (रा. घोटावडे फाटा, ता. मुळशी) असे नाव असल्याचे त्याने पोलिसांना सांगिंतले. (वार्ताहर)