शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांसाठीही कॅशलेस पद्धत

By admin | Updated: January 13, 2017 03:43 IST

पालिकेच्या निवडणुकीतील उमेदवाराने व त्याच्या पक्षानेही निवडणूक खर्चासाठी बँकेत स्वतंत्र खाते सुरू करून त्यातूनच

पुणे : पालिकेच्या निवडणुकीतील उमेदवाराने व त्याच्या पक्षानेही निवडणूक खर्चासाठी बँकेत स्वतंत्र खाते सुरू करून त्यातूनच खर्च करायचा आहे. बँकेतून आठवड्याला किती पैसे काढायचे, याचे बंधन असल्याने उमेदवाराला खर्चासाठी कॅशलेस पद्धतीचा वापर करावाच लागणार आहे. उमेदवाराने सोशलमीडियावर केलेला प्रचारही तपासण्यात येणार असून त्यात काही आक्षेपार्ह, नियमांचा, कायद्याचा भंग करणारे आढल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुणाल कुमार यांनी ही माहिती दिली. आयोगाने निवडणूक प्रक्रिया आदर्शपणे पार पडावी, यासाठी विविध सूचना केल्या असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. मात्र, असे करताना सर्वसामान्य नागरिकांना कशाचाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. पाणी, वीज, कचरा यासारखी अत्यावश्यक कामे सुरूच राहतील, त्यांना आचारसंहितेचा काहीही अडथळा होणार नाही, असे आयुक्तांनी सांगितले.आयुक्त म्हणाले, ‘‘उमेदवारांना ५ लाख रूपये खर्चाची मर्यादा आहे. पक्षाने, उमेदवाराच्या समर्थकाने व खुद्द उमेदवाराने अशा सर्वांनी मिळून केलेला खर्च उमेदवाराच्या खर्चात धरला जाईल. तो ५ लाख रूपयापेक्षा जास्त नसावा. खर्चासाठी उमेदवार व त्याच्या पक्षाला बँकेत स्वतंत्र खाते सुरू करावे लागेल व त्यातूनच खर्च करता येईल. पक्षाने त्यांचा एकत्रित खर्च निवडणूक झाल्यावर एका महिन्यात सादर करायचा आहे. उमेदवाराने त्याचा खर्च रोजच्या रोज आयोगाकडे द्यायचा आहे. समर्थकांच्या खर्चाची नोंदही त्याने केली पाहिजे. ’’ते म्हणाले, ‘‘उमेदवारी अर्ज आॅनलाइनच करावा लागेल. मात्र, त्या अर्जाची प्रत निवडणूक कार्यालयाकडे विहित मुदतीत वेळेत आणून द्यावा लागेल. प्रचार सभा कुठे घ्यायच्या, पोस्टर्स, बॅनर कुठे लावायचे त्याची यादी तयार आहे. पक्ष व उमेदवारांनाही त्यांना माहिती असणारी ठिकाणे सुचवायला सांगण्यात आले आहे. ती नावे आली की यादी जाहीर केली जाईल.’’ राजकीय पक्षांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना आयोगाच्या सर्व सूचना तसेच नियम, कायदे यांची माहिती देण्यात आली आहे. आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. (प्रतिनिधी)