शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकरांसह तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देणेकऱ्यांकडून तगादा लावल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घर सोडून निघून गेलेले प्रसिद्ध उद्योजक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : देणेकऱ्यांकडून तगादा लावल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घर सोडून निघून गेलेले प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर शिवाजीनगर पोलिसांनी २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात बांधकाम व्यवसायात तोटा झाल्याने देणेकऱ्यांच्या तगाद्याला वैतागून निराशेतून उद्योजक गौतम पाषाणकर हे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घरातून निघून गेले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती.

दीप विजय पुरोहित (रा. कल्याणीनगर), गौतम पाषाणकर आणि रिनल पाषाणकर (रा. शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी नरेंद्र पंडितराव पाटील (वय ४२, रा. सिल्व्हर स्प्रिंग सोसायटी, पंचवटी) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र पाटील यांनी पाषाणकर यांच्या खराडी येथील प्रॉक्सिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमधील सी बिल्डिंगमध्ये पी १०१ व १०२ हे फ्लॅट खरेदी करण्याचे ठरविले. त्यांची २ कोटी ८७ लाख रुपये किंमत ठरविण्यात आली. तसा लेखी करारनामा करण्यात आला. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून २ कोटी ४० लाख रुपये घेतले. मात्र, त्यानंतर त्यांनी मिळकतीचा ताबा व नोंदणीकृत दस्त न करता पी १०२ या सदनिकेचे खरेदीखत सुशील झोरर तर्फे कुलमुख्यत्यार म्हणून मनीषा गोरद (रा. रेंजहिल्स) व पी १०१ ही सदनिका गणेश शिंदे (रा. वडगाव शेरी) यांच्या नावावर करून दिली़. याबाबत फिर्यादी यांनी त्यांना जाब विचारला असता त्यांनी ८ जून २०२० रोजी फिर्यादी यांना जंगली महाराज रोड येथील पाषाणकर ग्रुपच्या कार्यालयात बोलाविले. तेथे त्यांनी व त्यांच्या नोकरांनी मारहाण करून फिर्यादी यांचा उजवा पाय फ्रॅक्चर केला अशी, नरेंद्र पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर पोलिसांनी ४०९, ४२०, ३२६, ५०६, ३४ अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

व्यवसायासाठी गौतम पाषाणकर यांनी काही जणांकडून पैसे घेतले होते. व्यवसायात तोटा आल्याने त्यांच्याकडून पैशांसाठी तगादा सुरू होता. त्यामुळे नैराश्येतून उद्योजक गौतम पाषाणकर यांनी आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून २१ ऑक्टोबर २०२० रोजी घर सोडून ते निघून गेले होते. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक कारणामुळे उद्योजक आत्महत्या करण्याच्या इराद्याने घर सोडून निघून गेल्याने पुण्यासह संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. ते पुण्यातून कोल्हापूरसह दक्षिणेतील अनेक शहरांमध्ये फिरले. त्यानंतर ते दिल्लीहून जयपूर येथे गेले होते. तेथे ते एका हॉटेलमध्ये उतरले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाला मिळाली. या पथकाने जयपूर येथे जाऊन तब्बल ३३ दिवसांनी गौतम पाषाणकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुण्यात आणून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले होते.

पोलिसांनी त्यांना परत आणल्यानंतरही आतापर्यंत पाषाणकर यांनी पैसे परत न दिल्याने शेवटी नरेंद्र पाटील यांनी फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे तपास करीत आहेत.