शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत गुन्हा घडल्यास तत्काळ ॲपवर नोंदवता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रसाद कानडे पुणे : रेल्वेत सामान चोरीला गेले, मारहाण झाली, महिलांचे दागिने लुटले यासाठी प्रवाशांना आपला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रसाद कानडे

पुणे : रेल्वेत सामान चोरीला गेले, मारहाण झाली, महिलांचे दागिने लुटले यासाठी प्रवाशांना आपला प्रवास अर्धवट सोडून तक्रार देण्यासाठी आरपीएफ, जीआरपी (लोहमार्ग पोलीस) कडे जाण्याची गरज नाही. कारण, रेल्वे प्रशासनाने ''रेल सुरक्षा'' हे नवीन ॲप विकसित केलं आहे. यावर प्रवाशांना तत्काळ तक्रार देता येईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. शिवाय, तक्रारीसाठी होणारी चालढकल देखील थांबणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने तयार केलेला ''रेल सुरक्षा'' ॲप लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. हे ॲप विकसित करताना आरपीएफ व जीआरपी यांच्या यंत्रणेशी कनेक्ट केले आहे. शिवाय संबंधित राज्याच्या पोलीस यंत्रणेशी देखील हे जोडण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेत एखादा गुन्हा घडल्यास त्याची तत्काळ माहिती संबंधित राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्यापर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे आंतरराज्य गुन्हेगारला पकडणे सोपे होइल.

बॉक्स 1

आंतरराज्य गुन्हेगाराला पकडणे सोपे

लांबपल्ल्याच्या गाड्या या तीन ते चार राज्यातून प्रवास करीत असतात. अशा वेळी रेल्वेत एखादा गुन्हा घडवून आरोपी सहजपणे दुसऱ्या राज्यातील स्थानकावर उतरून पळून जाई. अशा आरोपींना पकडणे अनेकदा मुश्कील होते. नव्या ॲपमुळे देशातील सर्व राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाला जोडण्यात आहे. त्यामुळे एका राज्यात गुन्हा करून दुसऱ्या राज्यात पळून जाणाऱ्या आरोपीला पकडणे सोपे होईल.

बॉक्स 2

सिग्नल यंत्रणा तोडू नये म्हणून :

अनेकदा रात्रीच्या वेळी रेल्वेवर दरोडे पडतात. त्यावेळी दरोडेखोर हे सिग्नल यंत्रनेतील वायर तोडून टाकतात. त्यामुळे गाडीला रेड सिग्नल मिळतो. गाडी थांबली की दरोडा टाकतात आणि पळून जातात. रेल्वेने आता सिग्नल यंत्रनेत बदल करायचे ठरविले आहे. त्यामुळे आता सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करता येणार नाही. परिणामी, गाडी थांबवून प्रवाशांना लुटता येणार नाही.

----------------------

रेल सुरक्षा ॲप आम्ही विकसित केले असून लवकरच ते प्रवाशासाठी उपलब्ध होईल. यामुळे रेल्वेतील गुन्ह्याचा तपास लवकर होईल. गुन्हाचे देखील प्रमाण घटेल.

अजय सदानी, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, मुंबई