शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीने चहाविक्रेत्याला उडवले

By admin | Updated: October 14, 2016 04:51 IST

बेदरकार मोटारचालकाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका चहाविक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी घडला.

पुणे : बेदरकार मोटारचालकाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका चहाविक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी घडला. डेक्कन पोलिसांनी मोटारचालकाला अटक केली आहे.शंकर पाटीदार (रा. उत्तमनगर, मूळ रा. राजस्थान) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सूर्यकांत औताडे (वय ४५, रा. महर्षीनगर) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औताडे एका टुरिस्ट मोटारीवर चालक म्हणून काम करतो. पाटीदार बुधवारी सकाळी रस्त्यावरून चालत जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा कुत्राही होता. पदपथालगत चालत जात असताना पाठीमागून आलेल्या मोटारीची त्यांना जोरात धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती, की हवेमध्ये उंच उडालेले पाटीदार काही मीटर अंतरावर जाऊन रस्त्यावर आपटले. मोटारीच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून, काही अंतरावर जाऊन ही मोटार उभी राहिली. चालक औताडे याने नागरिकांच्या मदतीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. पाटीदार यांच्या डोक्याला जबर मार लागला, तसेच रक्तस्रावही मोठ्या प्रमाणावर झाला होता. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)