निरवांगी : इंदापूर तालुक्यात सर्वच साखर कारख्यान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. तालुक्यात बाहेरच्या जिल्ह्यांमधून ऊसतोडणी मजूर दाखल झाले आहेत. मात्र, ऊसतोडणी मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित आहेत.
ज्या वयात शिकायचं त्या वयात या चिमुरडय़ांना आईबापाच्या मागे उसाच्या फडात मजुरीसाठी राबावे लागत आहे.
शासनाने साखर शाळाच्या माध्यमातून या मुलांच्या शिक्षणाची सोय केली होती. मात्र, आज या साखर शाळा बंद अवस्थेत आहेत. यांच्या शिक्षणाबाबत प्रशानसाबरोबच पालकही उदासीन असल्याचे चित्र आहे.
शाळेत येऊन अ. आ. ई. चे अक्षर गिरवण्याऐवजी ही मुले उसाच्या फडातच रमताना दिसत आहेत. ऊसतोडणी मजुरांच्या अजून किती पिढय़ा उसाच्या फडातच कष्ट करण्यात जाणार, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
आपल्या शिक्षणाच्या अधिकारापासून या मुलांना कायमच वंचित राहावे लागणर का. अशी सध्याची परिस्थिती झाली आहे.
शासनाने या मुलांसाठी विशेष उपक्रम राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. (वार्ताहर)
4स्पर्धेच्या या युगात आपले पाल्य टिकावे म्हणून प्रत्येकजण शिक्षणासाठी आग्रही असतो. मात्र, जिथे कायमच अठराविश्वे दारिद्य्र आहे. पोट भरण्यासाठी कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. हाता-तोंडाची गाठ पडण्यासाठी या लहानग्यांनाही आईवडिलांबरोबर उसाच्या फडात घाम गाळावा लागतो. त्यांच्या शिक्षणासाठी कोण आग्रही राहणार, यासाठी या मुलांच्या पालकांनी, साखर कारखान्यांनी आणि शासनानेही लक्ष देणो गरजेचे आहे.
4नुकतेच शासनाने दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नांसाठी एक मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर या मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही ठोस पावले उचलण्याची गरज आहे. इतर मुलांप्रमाणो ऊसतोडणी करणा:या मजुरांच्या मुलांनाही चांगले शिक्षण मिळणो गरजेचे आहे.