शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

सीए फॅक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST

खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन चार्टर्ड अकाऊंटंट झालेल्या धनंजय वाळके यांनी आतापर्यंत अनेक होतकरू तरुणांना संधी देऊन त्यांचे सीए होण्याचे ...

खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन चार्टर्ड अकाऊंटंट झालेल्या धनंजय वाळके यांनी आतापर्यंत अनेक होतकरू तरुणांना संधी देऊन त्यांचे सीए होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. धनंजय यांना शिक्षणासाठी जास्त पैसे खर्च करणे शक्य नव्हते. मेडीकल, इंजिनिअरिंगच्या तुलनेत सीएसाठी कमी खर्च होणार असल्याने त्यांनी जिद्दीने हे शिक्षण पूर्ण केले.

त्यामुळे आता स्वत: पुण्यातील प्रथितयश सीए व्यावसायिक असलेले धनंजय वाळके पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांना आवर्जून संधी देतात. त्यांनी आतापर्यंत बिहार, राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कोकण परिसरातील मुलांना संधी दिली आहे. या मलांपैकी कोणाचे वडील भेळ विक्रेते, रोजंदारीवर काम करणारे आहेत.

वाळके यांचे वय ३७ पण त्यांचा आताचा अनुभव २२ वर्षांचा आहे. याचे कारण म्हणजे दहावी झाल्यापासूनच ते आर्थिक क्षेत्रात काम करत आहेत.

सीए झाल्यावर वाळके यांनी कार्पोरेट क्षेत्रात तीन-चार वर्षे नोकरी केली. मोठ्या कंपन्यांमध्ये काम करताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की, सीएसाठी आपले बेसिक अंडरस्टँडिंग असणे खूप महत्त्वाचे आहे. नफा होणार की तोटा हे माहीत नसेल तर आपल्याला ग्राहकाला सल्ला देता येत नाही. यानंतर स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली.

सुरुवातीला त्यांना वडिलांकडून लाख मोलाची मदत मिळाली. त्यांचे वडील जास्त शिकलेले नव्हते. त्यांनी चाळीस वर्षे किर्लोस्कर या कंपनीत काम केले. पण मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने साहजिकच अडचणी येत होत्या. सी. ए. करून नंतर व्यवसायात उतरायचे हे कुटुंबीयांना सुरुवातीला जोखमीचे काम वाटत होते. पण घरच्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. धनंजय यांच्या पत्नीही सीए आहेत.

धनंजय हे आता मराठा आंत्रप्रिन्यूअर असोसिएशन मॅनेजमेंट कमिटीमध्ये कार्यरत असून या कमिटीमध्ये जवळपास ९०० मान्यवर मंडळींचा समावेश आहे. सी. ए. झाल्यामुळे एखादी गोष्ट कशी बनते, ती कशी विकली जाते अथवा त्यातील खाचाखोचा सगळे माहीत असल्याचे ते सांगतात. यामुळे प्रत्येक बिझनेस स्टँडचे वेगळेपण काय आहे हे समजते.