शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या 2 जागांसाठी जानेवारीत पोटनिवडणूक

By admin | Updated: October 26, 2014 00:07 IST

महापालिकेतील दोन नगरसेवकांनी पक्षांतर करून विधानसभा निवडणूक लढविली. त्यामुळे त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता.

पुणो : महापालिकेतील दोन नगरसेवकांनी पक्षांतर करून विधानसभा निवडणूक लढविली. त्यामुळे त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. या दोन जागांसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पोटनिवडणूक होणार आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी ही पोटनिवडणूक निर्णायक ठरणार आहे. 
हडपसर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन मनसेची उमेदवारी घेतली, तर कसबा मतदारसंघातून राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला. परंतु, पक्षांतर केल्यामुळे नगरसेवकपद संपुष्टात आले आहे. त्यामुळे केळेवाडी प्रभाग क्रमांक 26 (ब) आणि हडपसर प्रभाग क्रमांक 45 (अ) या दोन जागांसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. साधारणत: डिसेंबर महिन्यात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन जानेवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे, असे महापालिकेतील वरिष्ठ अधिका:यांनी सांगितले.  (प्रतिनिधी)
 
विरोधी पक्षनेतेपदासाठी निर्णायक ?
1 महापालिका निवडणुकीत मनसेला 29 आणि काँग्रेसला 28 जागा मिळाल्या होत्या. मात्र, खोटय़ा प्रमाणपत्रमुळे मनसेच्या नगरसेविका प्रिया गदादे व कल्पना बहिरट यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते.  पोटनिवडणूक झाल्यानंतर बहिरट यांच्या जागेवर काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके निवडून आल्या, तर प्रिया गदादे यांना पुन्हा संधी मिळाली. 
2 मनसेची एक जागा कमी झाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळाले होते. परंतु, मानकर  यांच्यामुळे काँग्रेसची एक जागा कमी होऊन, भानगिरे यांच्यामुळे मनसेची एक जागा पोटनिवडणुकीत वाढणार का, याची उत्सुकता आहे.