शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मंचरला थेट बांधावरच आंब्याची खरेदी!

By admin | Updated: June 15, 2015 05:59 IST

आंबेगाव तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. या शेतकऱ्यांची आंबा खरेदी थेट शेताच्या बांधावर होत असल्याने

मंचर : आंबेगाव तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. या शेतकऱ्यांची आंबा खरेदी थेट शेताच्या बांधावर होत असल्याने, तसेच त्यांच्या समोरच वजन, रोख पैसे हातात मिळत असल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रथमच चांगला नफा मिळू लागला आहे.आंबेगाव तालुक्यात आंबा सिझन चांगला होतो. पश्चिम पट्टा तर मिनी कोकण म्हणून ओळखला जातो. यापूर्वी व्यापारी थेट शेतकऱ्याच्या शेतात येऊन झाडाची उक्ती खरेदी करायचे, आंब्याची बाग आहे त्या स्थितीत सौदा करून व्यापारी घेत. यात व्यापारी मात्र मालामाल होत, तर शेतकऱ्यांच्या हातात खूपच कमी पैसे राहात होते. मागील वर्षापासून चित्र बदललेले आहे. मंचर शहरातील अभिनव आंबा खरेदी केंद्राकडून आंब्याची शेतावरील बांधावर जाऊन खरेदी केली जाते. त्यासाठी आमोंडी, गंगापूर, पारुंडे येथे, तसेच मंचर शहरात आंब्याची खरेदी केली जाते.उंच आंब्याच्या झाडावरील आंबे काढताना अनेकदा शेतकरी जखमी होतात. असे प्रकार होऊ नये यासाठी आंबा काढण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या खुडचा शेतकऱ्यांना पुरविण्यात आल्या आहेत. या खुडच्यांनी आंबे काढून शेतकरी क्रेटमध्ये आणतात. तेथे इलेक्ट्रीक काट्यावर आंब्याचे वजन करून प्रत ठरवली जाते. छोटे व डाग लागलेले आंबे सुद्धा स्वीकारले जातात. शेतकऱ्यांना समोरच हिशोब करून रोख पैसे दिले जातात.हापूस, देवगड, राजापुरी, केशर हे आंबे येथे विक्रीस येतात. शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च, दलाली, पॅकिंग हा सर्व खर्च वाचतो. शेतकऱ्यांना आता आंब्याचे अनेक पटीने जास्त पैसे मिळू लागले आहेत. हा सर्व माल मुंबई येथील मल्हार बाबूराव बेंडे यांच्या दुकानावर पाठविला जात असल्याची माहिती बाबासाहेब बेंडे व सतीश बेंडे यांनी दिली. आतापर्यंत १५ ट्रक माल पाठविण्यात आला आहे. दहा दिवस ही खरेदी जोरात सुरू राहणार आहे. (वार्ताहर)