शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी व कामगार आले आमनेसामने

By admin | Updated: June 17, 2014 02:19 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यावरून आता व्यापारी व कामगारांमध्ये जुंपली आहे

पुणे : स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यावरून आता व्यापारी व कामगारांमध्ये जुंपली आहे. कामगार फेडरेशनच्या व्यापाऱ्यांच्या विरोधातील भूमिकेला दि पूना मर्चंट्स चेंबरनेही प्रत्युत्तर दिले आहे. ‘कामगार फेडरेशनला जकात कशाकरिता पाहिजे, हे समाजाला माहीत आहे. जकातीमुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला होता, असे चेंबरने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.राज्य महापालिका, नगरपालिका कामगार फेडरेशनने राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ‘एलबीटी’ रद्द करण्यास विरोध दर्शविला आहे. याविषयी चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी भूमिका मांडण्यासाठी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. एलबीटीमार्फत व्यापारी रक्कम भरत आहेत. मागील आर्थिक वर्षामध्ये ‘एलबीटी’ची वसुली अपेक्षेपेक्षा जास्त झाली. व्यापारी शहराच्या विकासास हातभार लावत आहे. या करातील अडचणी दूर करून करपद्धतीमध्ये सुटसुटीतपणा असावा ही व्यापाऱ्यांची मागणी आहे, अशी मागणी करणे हे गैर नाही. व्यापारी महसूल कर भरण्यास नकार देत नाहीत, परंतु ही पद्धत सुटसुटीत असावी आणि त्याचा त्रास होऊ नये, एवढीच व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे, असे निवदेनात नमूद करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)