शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

बेल्हा येथे दोन ठिकाणी घरफोडी

By admin | Updated: April 28, 2017 05:40 IST

बेल्हा (ता. जुन्नर) येथील गावातच गजबजलेल्या मध्यवर्ती ठिकाणी तीन सशस्त्र चोरट्यांनी दोन ठिकाणी चोऱ्या केल्या. या घटनेत

बेल्हा : बेल्हा (ता. जुन्नर) येथील गावातच गजबजलेल्या मध्यवर्ती ठिकाणी तीन सशस्त्र चोरट्यांनी दोन ठिकाणी चोऱ्या केल्या. या घटनेत त्यांनी खोमणे यांच्या दवाखान्यातून दोन हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. मात्र गावात गजबजलेल्या ठिकाणी चोरी झाल्यामुळे ग्रामस्थांमध्येभीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान ही घटना काल पहाटेच्या सुमारास घडली.गावातील चांदणी चौक, पोळेश्वर चौक या नागरिकांनी कायम गजबजलेल्या मध्यवर्ती ठिकाणी गुरुवारी पहाटे दीड ते दोनच्या सुमारास कटावणी, बॅटरी अशी हत्यारे घेतलेल्या सशस्त्र तीन तरुण चोरट्यांनी चांदणी चौकातील अजित बिअरबार परमिटरूम दुकानाची कुलुपे तोडून गल्ल्यातील रोकड व मद्याची चोरी केली. त्यानंतर त्यांचा मोर्चा पोळेश्वर चौकातील डॉ. मनोहर विठोबा खोमणे यांच्या शांती नर्सिंग होम नावाच्या दवाखान्याच्या दिशेने वळविला. त्यांनी तळघराचा दरवाजा तोडून इमारतीत प्रवेश मिळविला. त्या चोरट्यांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांची रुग्ण तपासणी खोलीच्या ड्रॉवरमधील दोन हजार रुपये लंपास केले. यानंतर त्यांनी इमारतीतील डॉक्टरांच्या निवासाकडे जाण्यासाठी जिन्यातील दरवाजाची कुलुपे तोडण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला. त्यांनी दुसऱ्या गेटची कुलुपे तोडून प्रवेश करत असताना झालेल्या आवाजाने डॉ. खोमणे यांच्या पत्नी दीपाली यांना जाग आल्यानंतर त्यांनी डॉ. खोमणे यांना उठवले. डॉ. खोमणे यांनी त्यांचा घराचा दरवाजा उघडण्याची आणि चोरटे जिना चढून समोर येण्याची वेळ एकच झाली. त्याचवेळी डॉक्टरांनी आरडाओरडा केल्याने ते तीन चोरटे पसार झाले. हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या तीनही चोरट्यांच्या छायाचित्रांसह हालचालींचे चित्रण झाले आहे.