शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाने कोलमडला शेतकरी

By admin | Updated: May 6, 2017 02:05 IST

शेतीमालाचे घसरलेले दर, उन्हाचा चटका, दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असतानाच वीज महावितरण कंपनीने भारनियमन

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : शेतीमालाचे घसरलेले दर, उन्हाचा चटका, दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असतानाच वीज महावितरण कंपनीने भारनियमन सुरू केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भरच पडली आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना भारनियमनाचा ‘शॉक’ बसला आहे. याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक तुषार झेंडे यांनी महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता भारनियमन सुरू केले आहे.यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक आहे. पाणीटंचाईचे संकट आहेच. त्याचबरोबर शेतीमालाचे दरही कोसळल्याने शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्याआत्महत्येचे लोण बारामती तालुक्यातदेखील आले आहे. आतापर्यंत तीन शेतकऱ्यांनी नापीकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून राजकीय रणकंदन सुरू असतानाचा विजेच्या तुटवड्यामुळे तातडीने भारनियमन सुरू केले आहे. सध्या सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत ग्रामीण भागात भारनियमन सुरू करण्यात आल्याचे बारामती परिमंडलाच्या सूत्रांनी सांगितले. या भारनियमनामुळे आंदोलने करून सोडण्यात आलेल्या कालव्याच्या आवर्तनाचे पाणीदेखील शेतकऱ्यांना घेता येत नाही, अशी स्थिती आहे. भारनियमनाच्याविरोधात शेतकरी संतापले आहेत. या भारनियमनाच्याविरोधात ग्राहक पंचायतीचे संघटन तुषार झेंडे यांनी भारनियमनाची पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. विद्युत नियामक आयोग व विद्युत कायदा २००३ च्यानुसार ही कृती आक्षेपार्ह आहे. त्यामुळे भारनियमन न थांबवल्यास ग्राहक न्यायालयात तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. १महावितरणच्या बारामती मंडलात बारामती ग्रामीण, वालचंदनगर, इंदापूर या उपविभागातील गावांमध्ये १० ते १२ तासांचे अतिरिक्त वीज भारनियमन सुरू केले आहे. सिंगल फेज, थ्री फेज अशा सर्व प्रकारचा विद्युत पुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. २पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मात्र या अघोषित भारनियमनामुळे अतिशय नाराजीची भावना असून हे भारनियमन तातडीने बंद करावे असे ठराव गावागावांत होत आहेत.