शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांत काट्याची टक्कर

By admin | Updated: February 14, 2017 02:21 IST

पंख्याच्या आकारासारखा आणि सर्वांत मोठा प्रभाग असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी या प्रभाग क्र.७ मध्ये

पुणे : पंख्याच्या आकारासारखा आणि सर्वांत मोठा प्रभाग असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी या प्रभाग क्र.७ मध्ये काँग्रेसचे नगरसेवक दत्ता बहिरट, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेल्या पण, उच्च न्यायालयाने अपक्ष ठरविलेल्या नगरसेविका रेश्मा भोसले तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश निकम यांच्यातील लढतीने सर्व पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे़ हा प्रभाग शहरातील सर्वांत मोठा समजला जातो़ तीन तुकडे एकत्र करून बनविलेल्या या प्रभागाच्या एका भागाचा दुसऱ्या भागाशी फारसा संबंध येत नाही़ ८४ हजार मतदारसंख्या असलेल्या या प्रभागातील चार जागांसाठी वेगवेगळ्या भागातील उमेदवार निवडताना सर्वच पक्षांचा कस लागला़ मागील दोन-तीन महिन्यांत नव्याने समावेश केलेल्या भागातील मतदारांना आकृष्ट करण्यासाठी काशी यात्रांपासून मुलांना अम्युझमेंट पार्कची सफर घडविण्यात इच्छुक दंग होते़ प्रत्येक उमेदवाराने नव्या भागात आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला़ काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता बहिरट यांना मानणारा मतदार या भागात आहे़ याशिवाय स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड़ नीलेश निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे़ या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्वीपासून प्राबल्य होते़ त्याचा लाभ त्यांना मिळेल का, हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे़ विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने नाट्यमयरीत्या त्यांनी भाजपामध्ये केलेला प्रवेश, यानंतर राज्य निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप, आणि त्याला उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय यामुळे या प्रभागाची राज्यभर चर्चा झाली़ रेश्मा भोसले यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले़ त्याचा निर्णय सोमवारी लागून त्यांची अपक्ष उमेदवारी कायम केली आहे़ भाजपाने त्यांना पुरस्कृत केले आहे. भाजपाचे कमिटेड मतदार कमळ चिन्ह नसताना त्यांना मतदान करणार का, हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे़ याशिवाय शिवसेनेचे हरीश निकम आणि मनसेचे श्याम माने हे कशी लढत देतात, यावर पारडे कोणाकडे झुकणार, हे निश्चित होण्याची शक्यता आहे़ प्रभाग ७मधील ‘अ’ गटातून राष्ट्रवादी काँगे्रसच्या आशा साने, भाजपाच्या सोनाली लांडगे, शिवसेनेच्या वनमाला कांबळे आणि काँग्रेसच्या रूपाली मोरे यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे़ प्रभाग ७ ‘ब’मध्ये भाजपाच्या राजश्री काळे, काँग्रेसच्या नंदा रोकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनश्री चव्हाण, शिवसेनेच्या सुरेखा भवारी यांच्यात लढत होत आहे़ ७ ‘क’मध्ये ९ उमेदवार असले तरी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व शिवसेनेचे उमेदवार विनोद ओरसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका शारदा ओरसे यांचे पुत्र रवींद्र ओरसे तसेच काँग्रेसच्या छाया शिंदे, भाजपाचे आदित्य माळवे आणि मनसेचे शंकर पवार यांच्यात लढत रंगणार आहे़ (प्रतिनिधी)