शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:11 IST

एक अटकेत : पावणे चार लाखांची फसवणूक : खोट्या गुन्ह्यात अडविण्याची दिली धमकी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शुुभ ...

एक अटकेत : पावणे चार लाखांची फसवणूक : खोट्या गुन्ह्यात अडविण्याची दिली धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शुुभ ट्रेड बीज इंडिया या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास सोने आणि चारचाकी गाडी देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची पावणे चार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पैसे परत मागितल्यावर बांधकाम व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी पोलीस कर्मचाऱ्याने दिली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पोलीस कर्मचार्‍यासह कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभिजित धोंडिबा सावंत (वय ४०, रा. कोल्हापूर) याला अटक केली आहे.

पोलीस कर्मचारी संतोष सावंत व शुभ ट्रेड बीज इंडिया लि., लायब्लिटी पाटर्नरशीप या कंपन्याचे सर्व संचालक अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या प्रकार नवले पुलाजवळील सावंत याचे कार्यालय व कोल्हापूर येथील कार्यालयात जुलै २०२० ते २० जानेवारी २१ दरम्यान घडला.

निखिल लक्ष्मणराव मिरगे (वय २९, रा. सरगम सोसायटी, नांदेड सिटी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभ ट्रेड बीज कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास दरमहा मोठ्या परतावा तसेच दुचाकी, चारचाकी गाड्या, सोने यासारखी मोठी बक्षिसे कंपनीतर्फे देण्यात येतील असे आमिष दाखविले. त्यावर विश्वास बसावा म्हणून वृत्तपत्र, युट्यूब, फेसबूक यासारख्या माध्यमातून कंपनीविषयी आकर्षक जाहिराती दिल्या. फिर्यादी यांना कंपनीत ६३ लाख रुपये गुंतविण्यास भाग पाडले. सुरुवातीला ३ लाख ७८ हजार रुपयांचा परतावा दिला. त्यानंतर आतापर्यंत कोणताही परतावा न देता गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा अपहार केला. फिर्यादी व त्यांचे दाजी हे रक्कम मागण्यासाठी अभिजित सावंत यांच्या नऱ्हे येथील कार्यालयात गेले असताना त्यांनी शिवीगाळ करत पिस्तूल दाखवून फिर्यादी यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांचा पोलीस खात्यातील भाऊ संतोष सावत यानेही फिर्यादी यांचे दाजी यांना बोलावून घेऊन शिवीगाळ करीत पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. गुंडामार्फत त्यांच्या मर्सिडीज गाडीचे वायपर व साईड मिरर तोडून नुकसान केले.