शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेतून उलगडणार अंदाजपत्रक

By admin | Updated: May 16, 2017 07:03 IST

महापालिकेच्या सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या तब्बल ५ हजार ९१२ कोटी अंदाजपत्रकावरील चर्चा मंगळवारपासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रंगेल

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या तब्बल ५ हजार ९१२ कोटी अंदाजपत्रकावरील चर्चा मंगळवारपासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रंगेल. विरोधकांनी आपल्या तोफा तयार केल्या असून, सत्ताधारीही आपल्या योजनांच्या समर्थनार्थ तयारीत आहेत. ४ दिवस तरी ही चर्चा रंगण्याची शक्यता आहे.अंदाजपत्रकाला दरवर्षीच्या नियोजित वेळेपेक्षा या वर्षी बराच विलंब झाला आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमताने सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीचे हे पहिलेच अंदाजपत्रक आहे. ५ हजार ९१२ कोटी अशा विक्रमी आकड्याचे ते आहे. स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त कुणाल कुमार यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात वाढ करून ते तयार केले आहे. वाढ करताना त्यांनी बांधकाम विभाग, मिळकतकर विभाग, स्थानिक संस्था कर यांच्यातून अवाजवी उत्पन्न अपेक्षित धरले असल्याचे दिसते आहे. विरोधकांचा सर्वांत जास्त मारा त्यावरच होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची अंदाजपत्रकाच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी म्हणून सोमवारी संयुक्त बैठक झाली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, सभागृहातील सर्वाधिक ज्येष्ठ नगरसेवक असलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल, दीपक मानकर अशी बरीच मोठी फौज विरोधकांकडे आहे. त्यामुळेच त्यांनी अंदाजपत्रकातील कमकुवत दुवे हेरून त्यावरच जोर देण्याचे ठरवले असल्याची माहिती मिळाली. सत्ताधारी भाजपाकडे १०१ नगरसेवकांचा ताफा असला तरी त्यातील बरेचसे अनुनभवी आहेत. त्यामुळे अंदाजपत्रकाबाबत त्यांच्यातील बरेसचे गोंधळलेलेच आहेत. त्यांचे हे गोंंधळलेपण दूर करण्यासाठी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मोहोळ यांनी सर्व नगरसेवकांची बैठक सोमवारी घेतली. त्यात विरोधकांना कोणी प्रत्युत्तर द्यायचे याचे नियोजन करण्यात आले. स्विकृत नगरसेवकांमध्ये गणेश बीडकर यांचा समावेश असल्याने ती भाजपाकडे जमेची बाजू आहे.