शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अंदाजपत्रकात १२०० कोटींची तूट

By admin | Updated: January 15, 2015 00:28 IST

२०१५-१६ या पुढील आर्थिक वर्षासाठी अतिरिक्त आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी ३९९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे.

पुणे : २०१५-१६ या पुढील आर्थिक वर्षासाठी अतिरिक्त आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी ३९९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. पालिका प्रशासनाच्या अंदाजपत्रकाने या वर्षी चार हजार कोटींचा टप्पा गाठला आहे. २0१0-११ मध्ये प्रशासनाकडून २९८४ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. त्यानंतर ११-१२ मध्ये ३२४७ कोटी, १२-१३ मध्ये २३९0, १३-१४ मध्ये ३६0५ कोटी, तर १४-१५ साठी ३६0८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासनाकडून सादर करण्यात आले होते. या वर्षी अंदाजपत्रकात सुमारे १000 ते १२00 कोटी रुपयांची तूट येऊनही कुमार यांनी ३९९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे.चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपकात ४ हजार १५० कोटी रुपयांचे उत्पन्न गृहीत धरून खर्चाचे नियोजन करण्यात आले. मात्र, डिसेंबर अखेरपर्यंत २ हजार ३०३ कोटी जमा झाले आहेत. त्यामध्ये पुढील ३ महिन्यांतले उत्पन्न धरून साधारण १२०० कोटी रुपयांची तूट येणार असल्याचे पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. २०१५-१६ चे अंदाजपत्रक वास्तविक पातळीवर मांडण्यात आल्याचेही ते म्हणाले. अंदाजपत्रक सादर केल्यानंतर कुणाल कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कुमार म्हणाले, ‘‘डिसेंबरअखेर २ हजार ३०३ कोटी रुपये जमा असले तरी जेएनएनयूआरएम, राज्य शासन, जिल्हाधिकारी यांच्याकडून अनुदान रक्कम मिळणार आहे. येत्या ३ महिन्यांत पाचशे ते सहाशे कोटी रुपये जमा होतील. त्यामुळे अंदाजपत्रकीय तूट बाराशे कोटींपर्यंत राहू शकेल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण आणून ताळमेळ घातला आहे.’’ उत्पन्न व खर्च याचा विचार करून वास्तविक पातळीवरच आगामी अंदाजपत्रक बनविण्यात आल्याचे कुणाल कुमार यांनी सांगितले. राज्य शासनाकडून स्थानिक संस्था कर (एलबीटी) मार्चअखेर रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असताना एलटीबी उत्पन्नाचा आगामी अंदाजपत्रकात समावेश करण्यात आल्याबाबत कुमार यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘‘एलबीटीचे काय होणार आहे याविषयी माहिती नाही; मात्र एलबीटी गेली तर इतर कोणत्याही मार्गातून त्या उत्पन्नाची तूट भरून काढता येऊ शकणार नाही. एलबीटीला व्यावसायिकांचा पूर्वीपासून विरोध आहे, त्यामुळे पालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळविता आलेले नाही. तरीही व्यावसायिकांना नोटिसा बजावून एलबीटीची वसुली करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.’’ शहरात मिळकतींचे पुनर्मूल्यांकन नव्याने होेणार आहे. मिळकतकराच्या वसुलीसाठी बाह्य यंत्रणांची मदत घेतली जाणार असून अंदाजपत्रकाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असे कुमार म्हणाले.