शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएफआयचे अध्यक्ष राजन खिंवसरा यांचा ‘पीवायसी’तर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बिलियर्ड्स आणि स्नूकर फेडरेशन ऑफ इंडियाच्या (बीएसएफआय) अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजन खिंवसरा यांचा पीवायसी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बिलियर्ड्स आणि स्नूकर फेडरेशन ऑफ इंडियाच्या (बीएसएफआय) अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजन खिंवसरा यांचा पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या कार्यकारी समितीतर्फे सत्कार करण्यात आला.

बीएसएफआयच्या अध्यक्षपदी निवड झालेले खिवंसरा हे महाराष्ट्रातील तसेच पुण्यातील पहिलेच व्यक्ती आहेत. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे व अन्य समिती सदस्य या वेळी उपस्थित होते.

परांजपे म्हणाले की, पुण्यातील क्यू स्पोर्टस्मध्ये पीवायसी हिंदू जिमखानाचा फार मोठा वाटा आहे. क्यू स्पोर्ट्मध्ये आपले फार मोठे योगदान देणारे राजन खिंवसरा आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे नातेही अतूट आहे. राजन खिंवसरा म्हणाले की, पीवायसी या माझ्या दुसऱ्या घरी आणि कुटुंबातच माझा सत्कार होत असल्याची माझी भावना आहे. पीवायसी हिंदू जिमखाना आणि मी हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत. मी आणि पीवायसी क्लबने १४ राष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. देशामध्ये क्यू क्रीडा प्रकारामध्ये गुणवान खेळाडूंची नवी पिढी तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबमध्ये क्यू स्पोर्टची अ‍ॅकॅडमी उभी करण्याचा आमचा मनोदय असून यासाठी आवश्यक मदत केली जाईल.

राजन खिंवसरा यांनी आत्तापर्यंत बीएसएफआयचे उपाध्यक्षपद दोन वेळा भूषविले आहे. महाराष्ट्र बिलियर्ड्स व स्नूकर संघटनेच्या अध्यक्षपदी ते २०१४-१७ या दरम्यान होते. तसेच संघटनेच्या उपाध्यक्षपद त्यांनी २००८ ते २०११ आणि २०११ ते २०१४ या कालावधीमध्ये भूषविले आहे.