शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीचे काम प्रगतिपथावर

By admin | Updated: June 4, 2016 00:15 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने किवळेतील मुकाई चौक ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक या दरम्यानच्या बीआरटीएस रस्त्याचे काम तीन भागात होत आहे

किवळे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने किवळेतील मुकाई चौक ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक या दरम्यानच्या बीआरटीएस रस्त्याचे काम तीन भागात होत आहे. किवळे व निगडी या दोन्ही बाजूंची कामे सध्या वेगात सुरू असून, काही भागातील डांबरीकरणाची कामे पूर्ण होऊन वाहतूकही सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. आजतागायत दोन्ही बाजूंकडील रस्त्यांचे एकूण ५५ टक्के काम पूर्ण झाले असून या रस्त्याच्या बांधकामासाठी एकूण ३३ कोटी २० खर्च झाला आहे. या रस्त्यावर रावेत येथे बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या नकाशाचे (डिझाईन) काम सध्या प्रगतिपथावर असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. मुकाई चौक ते भक्ती-शक्ती चौकादरम्यानच्या या ४५ मीटर रुंदीच्या या रस्त्याचे १४ जुलै २०१४ ला मुकाई चौकात व निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. जुलै २०१५ मध्ये रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४, १८ व १९ या तीन प्रभागांतून हा रस्ता विकसित करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम तीन भागात सुरू झालेले आहे. पहिल्या टप्प्यातील किवळे-मुकाई चौक ते लोहमार्ग दरम्यानच्या रस्त्याची एकूण लांबी २८५० मीटर राहणार असून, रुंदी ४५ मीटर असणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील लोहमार्ग ते निगडी भक्ती-शक्ती चौकादरम्यानच्या कामाची लांबी दीड किलोमीटर असून, या दोन्ही भागातील कामासाठी ७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही भागांतील रस्त्याची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. किवळे ते निगडी दरम्यान रावेत येथे लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, पुलाच्या कामासाठी निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. महापालिकेने यासाठी ८७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उड्डाणपुलाच्या डिझाईनचे काम सध्या सुरू असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. किवळे ते आदर्शनगर चौकापर्यंतचे काम पूर्ण होत आले आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते एमआयडीसीच्या हद्दीपर्यंत काम पूर्ण होत आले आहे. एमआयडीसी पाणीपुरवठा केंद्राच्या आवारातील, तसेच रावेत व पुणे-मुंबई लोहमार्गाच्या समांतर भागात रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्यामुळे द्रुतगती मार्गाने पुणे-मुंबईकडे ये-जा करण्यासाठी जवळचा रस्ता उपलब्ध होणार आहे. यामुळे सततच्या वाहतूककोंडीतून सुटका होणार असल्याने वेळ व प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. (वार्ताहर)