शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीसाठी ३९२ कोटींचा बुस्ट

By admin | Updated: March 31, 2017 03:09 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला पुणे महापालिकेकडून ३९२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला पुणे महापालिकेकडून ३९२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये नवीन बसखरेदी, आर्थिक संचलनातील तूट भरून काढणे, बस डेपो व टर्मिनल विकसित करणे, बीआरटी मार्गाची उभारणी आदी विकासकामे यातून केली जाणार आहेत.पीएमपी हा पुणेकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी एकत्र येऊन पीएमपीच्या संचलनासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ ही कंपनी स्थापन केली आहे. दोन्ही महापालिकांकडून पीएमपीच्या पायाभूत सुविधा व संचलनासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये पीएमपीसाठी ३९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. नवीन बस खरेदीसाठी १६४ कोटी रुपयांचा महापालिकेकडून दिला जाणार आहे. शहरातील पीएमपी बसचे डेपो व टर्मिनल विकासासाठी ३१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आर्थिक तूट संचलनासाठी १६५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. पीएमपी स्वतंत्र कंपनी झाली असली तरी ती तोट्यात असल्याने ही तूट भरून काढण्यासाठी दर वर्षी पालिकेकडून पीएमपीला अनुदान उपलब्ध करून दिले जाते. पुढील वर्षभरात पीएमपीच्या ताफ्यात नवीन १५५० बस दाखल होणार आहेत, त्यानंतर हे प्रमाण सुधारू शकेल. नवीन बस आल्यानंतर ३७० मार्गांवर बसची वारंवारता वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर एसी बसमुळे आरामदायी प्रवास करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध होईल. (प्रतिनिधी)सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असण्यासाठी प्रतिलक्ष लोकसंख्येमागे ५० बस असणे आवश्यक आहे. मात्र सध्या पुण्याची लोकसंख्या व पीएमपीच्या बसची संख्या पाहता हे गुणोत्तर प्रतिलक्ष लोकसंख्येमागे ३२ बस इतकेच आहे. पीएमपीसाठी २० वर्षांचा बिझनेस प्लॅनपीएमपीच्या पुढील २० वर्षांचा बिझनेस प्लॅन तयार करण्यासाठी एका संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेकडून महामंडळाच्या सर्व विभागाचा अभ्यास केला जात आहे. त्याचबरोबर रूट रॅशनलायझेशन करून आर्थिक खर्च कमी करणे व उत्पन्न वाढविणे, यावर भर दिला जाणार आहे.नवीन बस एप्रिल-मे मध्ये पीएमपीकडून आगामी वर्षभरात १५५० बसची खरेदी केली जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील बस मे-जून २०१७ मध्ये दाखल होणार असल्याची माहिती अंदाजपत्रकामध्ये देण्यात आली आहे.औंध, सातारा रस्ता व जुना मुंबई-पुणे हायवे या तीन मार्गांवर बीआरटीची उभारणी करण्यात येत आहे. २०१७ पर्यंत ४६ किमी बीआरटी मार्गाची उभारणी केली जाणार आहे. बस सेवेच्या सुधारणेसाठी जीपीएस बसविणे, पीएमपीच्या वेळापत्रकाचे अ‍ॅप तयार करणे आदी सुधारणा केल्या जात आहेत. मी कार्डचा वापर जास्तीत जास्त वाढविण्यावर पुढील वर्षात भर दिला जाणार आहे.