शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण प्रमुखांवर अहवालात ठपका?

By admin | Updated: May 20, 2014 04:06 IST

आचारसंहिता सुरूअसतानाही शिक्षण मंडळाच्या शाळांच्या सुशोभीकरणासाठी कुंड्या खरेदी प्रकरणी शिक्षण मंडळ प्रमुख तुकाराम सुपे यांच्यावर चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे.

पुणे : आचारसंहिता सुरूअसतानाही शिक्षण मंडळाच्या शाळांच्या सुशोभीकरणासाठी कुंड्या खरेदी प्रकरणी शिक्षण मंडळ प्रमुख तुकाराम सुपे यांच्यावर चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. या खरेदी प्रकरणात अनियमितता असून, आचारसंहितेत ही खरेदी करण्यात आली असून, या प्रकरणी सुपे यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, हा अहवाल कारवाईच्या शिफारसीसह महापालिका आयुक्त विकास देशमुख यांच्याकडे सादर करण्यात आला असून, उद्या (मंगळवारी) स्थायी समितीच्या बैठकीसमोर तो मांडण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असतानाही मंडळाच्या शाळासाठी हजार रुपयाला एका कुंडीची खरेदी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या कुंड्या खरेदी करताना प्रत्येक शाळेसाठी एक कुंडी एक हजार रुपयांना एक या प्रमाणे तीन कुंड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यासाठी नियमांप्रमाणे खरेदी प्रक्रिया पार न पाडता ही खरेदी करण्यात आल्याचे कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे आणि मनसेचे गटनेते रवींद्र धंगेकर यांनी हा प्रकार उजेडात आणला होता. त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुपे यांच्यावर कारवाईची मागणी करून चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यासाठी मुख्य सभेत गोंधळ घातला. या मागणीनुसार आयुक्त विकास देशमुख यांनी सुपेंच्या चौकशीचे आदेश देऊन त्यांना १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविले होते. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी ही चौकशी नुकतीच पूर्ण केली असून, अहवाल आयुक्त विकास देशमुख यांना सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)