शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या गडावर भाजपाचे ‘पालक’

By admin | Updated: September 17, 2015 02:45 IST

महापालिकेतील प्रश्नाबाबत यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बैठका घेऊन पाठपुरावा करायचे. मात्र, राष्ट्रवादीच्या गडावर पहिल्यांदाच भाजपाचे नेते आणि पालकमंत्री

पिंपरी : महापालिकेतील प्रश्नाबाबत यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बैठका घेऊन पाठपुरावा करायचे. मात्र, राष्ट्रवादीच्या गडावर पहिल्यांदाच भाजपाचे नेते आणि पालकमंत्री गिरीश बापट यांना निमंत्रण दिले आहे. राज्य सरकारच्या अखत्यारित असणारे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना साकडे घातले जाणार आहे.राज्यात व केंद्रात काँग्रेस आघाडी तसेच भाजपा-सेनेची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील प्रश्नांबाबत आजवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बैठका घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि माजी शालेय शिक्षणमंत्री कै. प्रा. रामकृष्ण मोरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बैठका घेतल्या आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने शिवसेना व भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आढावा बैठक घेतली आहे. मात्र, राज्य सरकारच्या पातळीवर प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांना गती मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या गडावर पहिल्यांदाच भाजपाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. येत्या १९ सप्टेंबरला महापालिका भवनात पालकमंत्र्यांसमवेत बैठक होणार आहे. त्यात महापौर शकुंतला धराडे यांच्यासह ‘स्थायी’चे अध्यक्ष अतुल शितोळे, पक्षनेत्या मंगला कदम यांसह विषय समित्यांचे सभापती, गटनेत्यांना बोलावले आहे. (प्रतिनिधी)