शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

सुटा-बुटातील भाजपाचे ‘सेल्फी’ सरकार

By admin | Updated: May 27, 2015 01:05 IST

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा जनतेशी संपर्क राहिलेला नाही.

पुणे : भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा जनतेशी संपर्क राहिलेला नाही. सर्वच आघाड्यांवर हे सरकार अयशस्वी ठरले आहे. जनतेची त्यांच्यावर नाराजी असली तरी हे सरकार स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहे. त्यामुळे हे सुटाबुटातील सरकार ‘सेल्फी सरकार’ असल्याची टीका अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शोभा ओझा यांनी केली.मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसतर्फे मंगळवारी पुण्यात काँग्रेस भवन येथे ‘अच्छे दिनची पुण्यतिथी’ साजरी करण्यात आली. तसेच या वेळी महिला मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ओझा यांनी पत्रकारांशी संवाद साधत मोदी सरकारवर निशाणा साधला. या वेळी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी आदी उपस्थित होते. भाजपने वर्षभरापूर्वी दिलेल्या घोषणा हवेतच विरल्याची टीका करीत ओझा म्हणाल्या, ‘‘भाजपचा खरा चेहरा आता समोर आला आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेप्रमाणे लोकांचा विकास झाला नाही. केवळ अदानीसारख्या काही लोकांचाच विकास झाला. देशाचा विकास दर वाढला नाही. सुशासन, रोजगारीचे प्रश्न कायम आहेत. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले तरी सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. त्यांनी दिलेले प्रत्येक आश्वासन फोल ठरले आहे.’’ (प्रतिनिधी)मेक इन इंडिया फक्त स्वप्नच उरले आहे. इंधनाचे दर कमी न झाल्याने महागाई वाढलेलीच आहे. माहिती अधिकार कायदा कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे. तरीही हे सरकार स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहे. जनतेशी संपर्क नसलेले हे ‘सेल्फी’ सरकार आहे. मोदी यांच्या रुपाने पक्षाला एक चांगला ‘इव्हेंट मॅनेजर’ मिळाला आहे. त्यांनी वर्षभर हेच काम केले. काँग्रेसच्या सरकारने मागील १० वर्षांत सर्वाधिक विकास केला. मात्र, सुटाबुटातील या सरकारला हा विकास टिकविणेही शक्य होत नाही. आर्थिक दूरदृष्टी नसलेले हे दिशाहीन सरकार आहे. त्यामुळे मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने भाषणे कमी देवून काम अधिक करावे, असे ओझा म्हणाल्या.